कुठे पाश्‍चात्त्य विचारसरणी,तर कुठे हिंदु धर्म !

पाश्‍चात्त्य विचारसरणी आणि संशोधन केवळ सुखप्राप्तीसाठी असते. माणसाची सुखाची हाव कधीच पूर्ण होत नाही; म्हणून अनेक संशोधने करूनही मानव अधिकाधिक दुःखी होत आहे.

सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक

‘सर्वसाधारण व्यक्ती जे काही करते, त्यामागे तिचा उद्देश ‘काहीतरी हवे’, असा असतो. याउलट साधक करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा उद्देश ‘सर्वस्वाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायची’, असा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जीवन-मुक्त

‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी

हास्यास्पद पाश्‍चात्त्य शिक्षणप्रणाली !

‘पाश्‍चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, वाईट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

गुढीपाडव्याला नवीन वस्तूंची खरेदी किंवा कार्ये करण्यात वेळ आणि धन व्यय करण्यापेक्षा भावी युद्धकाळात जीवितरक्षण होण्यासाठी पूर्वसिद्धता अन् व्यय करा !

हिंदूंनो, या गुढीपाडव्याला भारतात विश्‍वकल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापित करण्यासाठी कृतीशील होण्याचा नवसंकल्प करा !’

धर्म शब्दाचा अर्थ

अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म !

अध्यात्माचे श्रेष्ठत्व !

‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

खर्‍या मनुष्याचे लक्षण

मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत असते, नुसती बडबड काही उपयोगाची नाही. दिलदारपणाच त्याला मोठेपणा मिळवून देतो. परहितासाठी झटणाराच खर्‍या अर्थाने मनुष्य होय.

संशोधनाच्या संदर्भात कुठे बालवाडीतील असल्याप्रमाणे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे सर्वज्ञ ऋषि !

‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्‍या ईश्‍वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’