खरे सुख

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना करण्याची अत्यावश्यकता !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

हिंदूंनो, व्यापक व्हा !

‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेचे महत्व !

‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मबंधनाचे महत्त्व

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर  गुरु) डॉ. आठवले

हिंदु धर्माची महानता !

‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम

‘आतापर्यंतच्या ७४ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले