भारताची दुर्दशा !

‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

ईश्‍वरी राज्यातील जनता कशी असेल ?

‘ईश्‍वरी राज्यातील जनता त्या त्या सणाला अनुरूप अशी साधना करील. सुट्टी मिळाली म्हणून मजा करायला जाणार नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा !

‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ नियतकालिके !

‘छोट्याशा ‘सनातन प्रभात’ने सहस्रो राष्ट्र आणि धर्म प्रेमी सिद्ध केले. याउलट लाखो वाचक असलेल्या नियतकालिकांनी आणि दूरचित्रवाहिन्यांनी हातांच्या बोटांवर मोजता येईल, इतके तरी राष्ट्र आणि धर्म प्रेमी सिद्ध केले का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मानवाची पराकोटीची अधोगती !

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

म्हातारपण, म्हणजे दुसरे बालपण – ‘आई गं’ !

‘म्हातारपणी शरीर जर्जर होऊन कोणतीही हालचाल करतांना वेदना अनुभवयास येतात. त्या वेदनांमुळे आपोआपच तोंडातून ‘आई गं’ हा शब्द बाहेर पडतो !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘स्वतःला सर्व कळते’, हा अहंभाव असतो; म्हणून त्यांना एकाही विषयाचे पूर्ण ज्ञान नसते, तर संतांना अहंभाव नसतो, त्यामुळे त्यांना शब्दातीत अनेक विषयांचे ज्ञान असते !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सर्वधर्मसमभाव’ मानणार्‍यांचे घोर अज्ञान !

‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्‍याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’

म्हातारपणाचा लाभ मृत्यूही हवासा वाटणे 

‘म्हातारपणात शरीर कोणत्याही स्तरावर साथ देत नसले की, अंथरुणावर खिळून रहावे लागते. अशा स्थितीत ना पैसा कमावण्याची इच्छा होते ना आयुष्यभर स्वकष्टाने कमावलेला पैसा ‘खाणे, पिणे आणि फिरणे’ यांसारख्या सुखांसाठी खर्च करण्याची इच्छा होते.

सध्याचा प्रतिकूल काळ म्हणजे आत्मचिंतन करण्याचा काळ आहे !

‘अनुकूल काळात नव्हे, तर प्रतिकूल काळातच साधकाच्या साधनेची खरी परीक्षा होते. आपत्कालीन स्थितीत आत्मपरीक्षण करण्याची नामी संधी असते. ‘अशा काळात आपली मनःस्थिती कशी आहे ? प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची मनाची कितपत सिद्धता आहे ?’, याचे चिंतन करता येते.