प्रकल्पांची माहिती देण्यासाठी सरकार श्वेतपत्रिका काढणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता एअरबस टाटा यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे.

‘सॅफ्रन’ आस्थापनाचा प्रकल्प भाग्यनगर येथे गेला !

भूमी मिळवण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा ‘सॅफ्रन’ आस्थापनाचा प्रकल्प भाग्यनगर येथे गेल्याचे समजते. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांना रोजगार मिळणार होता.

दिग्दर्शक साजिद खान यांनी लैंगिक छळ केल्याचा अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांचा आरोप !

हे आहे चित्रपट व्यवसायाचे खरे स्वरूप ! पोलीस आणि कायदा यांचा कोणताही धाक (भय) न रहिल्यानेच धर्मांध वारंवार अशा प्रकारेचे गुन्हे करून उजळ माथ्याने फिरत आहेत !

इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाने मराठी भाषेचा बळी जात आहे ! – डॉ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक

स्वत:च्या मातृभाषेवर प्रेम करून तिचा व्यवहारात अधिकाधिक उपयोग केला पाहिजे. अन्यथा आपण आपल्या संस्कृतीचे गुन्हेगार ठरू. इंग्रजी भाषा ही रोजगारासाठी आवश्यक असली, तरी त्यासाठी आपल्या मातृभाषेचा बळी देणे कदापी मान्य नाही, अशी विधाने ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली.

पोलीस ठाण्यात ध्वनीचित्रीकरण करणे गुन्हा नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

‘पोलीस ठाणे ही जागा गोपनीयता कायद्याच्या अंतर्गत (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही’, असे स्पष्ट करत याविषयीच्या याचिकेवरील सुनावणीमध्ये न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावी !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्था’ तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. असेच निवेदन मंचर येथेही देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे ‘लाईव्ह लोकेशन’ समजणार !

महामंडळाने नागपूर येथील सर्व आगारांमध्ये ‘डिस्प्ले बोर्ड’वर बसगाड्यांचे ‘लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टिम ऑन’ केले आहे. त्यामुळे कोणताही प्रवासी बसगाड्यांचे वेळापत्रक सहजपणे पाहू शकतो.

सांगलीतील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने साकारली विजयदुर्गची प्रतिकृती !

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने विजयदुर्गची प्रतिकृती साकारली असून दुर्ग पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी सुमारे ३०० चौरसफुटांत हुबेहूब दुर्ग साकारून समुद्रातील मराठ्यांची वीरगाथा हिंदूंच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर शहरात युवकांच्या विविध गटांकडून गडांच्या हुबेहूब प्रतिकृतींद्वारे इतिहास जागवण्याचा प्रयत्न !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास आजही गड-दुर्गांच्या रूपाने आपल्यासमोर आहे. हा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी कोल्हापूर शहरात विविध गटांकडून, तसेच काही वैयक्तिक स्तरावर गडांच्या हुबेहूब प्रतिकृतीद्वारे इतिहास जागवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी !

सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची २८ ऑक्टोबर या दिवशी दादर पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आली आहे.