मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’ची स्वाक्षरी मोहीम !

राष्ट्रपतींना ७५ सहस्र पत्रे पाठवणार !

इतर मागासवर्गीय समाजाचे राखीव आरक्षण वगळून निवडणुका घेण्यात येऊ नयेत !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण, विधीमंडळात एकमताने ठराव संमत

विधीमंडळात प्रवेश करण्यापूर्वी प्रतिदिन कोरोनाची चाचणी केली जाईल ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत चालू आहे. असे असतांना विधीमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला असून १ मंत्री आणि १ आमदार यांसह एकूण ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

बीडमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या सूचीत २ जिवंत व्यक्तींच्या नावांचा समावेश

अशा चुका होतातच कशा ? यातून नेमका मृत्यू कुणाचा झाला, हे कसे कळणार ? ही चूक कुणाकडून झालेली आहे, त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून माझ्या हत्येचा कट !

‘‘माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या दुसर्‍या बाजूने लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यासंह उभा होता. प्रारंभी माझ्या गाडीवर दगड फेक केली आणि गाडीचा वेग अल्प होताच भरधाव ट्रक माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला !

सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू ! – धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर

राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री, तसेच अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक हे सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भविष्यात सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू, अशी चेतावणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

विधीमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नांतून महाराष्ट्रात महिलांवर होणार्‍या अत्याचारांची विदारक स्थिती उघड !

विविध उपाययोजनांनंतरही महिलांवरील अत्याचारांत वाढ !

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली !

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिला आहे. त्यांनी लवकर संमती द्यावी, यासाठी त्यांची भेट घेण्यात आली.

पुणे येथील मायलेकींच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी न्याय !

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पीडित महिलेच्या आत्महत्येनंतर २९ वर्षांनी आरोपी पतीला दोषी ठरवून ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ! – खासदार श्रीरंग बारणे, मावळ (शिवसेना)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजूनपर्यंत न मिळणे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागणे, हे दुर्दैवी !