महाराष्ट्रातील सुपर मार्केटमध्ये आता ‘वाईन’ मिळणार : राज्य सरकारचा निर्णय !

मद्यपींना प्रोत्साहन देऊन त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणारे सरकार स्वहस्ते जनतेला व्यसनाधीन होण्यास उद्युक्त करून अधोगतीकडे नेत आहे, असेच सामान्य जनतेला वाटते !

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे पुणे येथे निधन !

आधुनिक वैद्य (डॉ.) अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नकार दिला. आपली पत्रकारिता गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असाहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली.

श्रीक्षेत्र मलंगगडानंतर त्याच्या बाजूचे पहाडेश्वर आणि कार्तिक गणेश पर्वत (जिल्हा ठाणे) बळकावण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !

दिवसेंदिवस धर्मांधांकडून गड आणि पर्वत बळकावण्याचे प्रयत्न होणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात प्रशासन अन् पोलीस यांना लज्जास्पद !

दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘झेड ब्लॅक’ या उदबत्तीच्या विज्ञापनातून राष्ट्रध्वजाचा अवमान !

प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे राष्ट्रद्वेषीच !

रहाता (जिल्हा नगर) येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढे (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !

रहाता (जिल्हा नगर) येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे (वय ९५ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२२ या दिवशी दुपारी २.२५ वाजता त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळामुळे देहत्याग केला.

गोवंशियांच्या हत्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी कह्यात घेऊन ९ घंटे पोलीस ठाण्यात तिष्ठत बसवून ठेवले !

धर्मांधांशी असा व्यवहार करण्याचे पोलिसांचे धारिष्ट्य झाले असते का ?

दूध भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई !

जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक, दूध संकलन केंद्रे, दूध प्रक्रिया केंद्रे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणारे दूध हे कायद्यातील मानकांप्रमाणे असल्याची निश्चिती करून पुढील प्रक्रियेसाठी घ्यावे आणि जनतेला निर्भेळ दूध पुरवावे – अन्न आणि औषध प्रशासन

नाट्यगृह चालवू शकत नसाल, तर आयुक्तांनी आसंदी खाली करावी ! – मनसेची मागणी

मनसेचे शहराध्यक्ष म्हणाले की, संत एकनाथ रंगमंदिराचे खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तमरितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे.

मत्तीवडे (कर्नाटक) येथे राजमाता जिजामाता यांच्या जयंतीच्या निमित्ताने धर्मप्रेमी युवतींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर पार पडले !

प्रशिक्षण शिबिरात सहभागी युवती प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त मृतांच्या वारसांना आर्थिक साहाय्याचे ३ सहस्र ३८९ अर्ज संमत !

रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे ४ सहस्र ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारकडून एक ‘पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे.