चंद्रावर सापडला प्राणवायू !

भारताच्या ‘चंद्रयान-३’ ला मोठे यश मिळाले आहे. चंद्रावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडलेल्या ‘प्रज्ञान’ रोव्हर या रोबोटने चंद्रावर प्राणवायू (ऑक्सिजन) असल्याचे शोधले आहे. यासह या रोव्हरला त्याला चंद्रावर ८ खनिजेही सापडली आहे.

सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बांधली राखी !

सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.

देहलीत ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या !

भारताच्या राजधानीत इतक्या सहजपणे कुणीही कुणाची हत्या करू शकतो, हे पोलिसांना लज्जास्पद !

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्‍यांवर कारवाई करणार ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, हस्तकला महामंडळ

प्रतिवर्षी अशी चेतावणी दिली जाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळही काही मूर्तीशाळांवर धाड घालून श्री गणेशमूर्ती मातीचीच आहे ना, याची पडताळणी करते; पण मूर्ती विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्यात मूर्ती तरंगतांना दिसतात.

गोव्यातील आमदार आता लेह-लडाखच्या अभ्यास दौर्‍यावर जाणार

आमदार अभ्यास दौर्‍यात काय शिकले ? त्याचा राज्यासाठी काय लाभ झाला ? किंवा होणार, ते जनतेला सांगावे, अन्यथा ‘असे अभ्यास दौरे हा केवळ जनतेच्या पैशातून मौजमजा करण्याचा एक प्रकार आहे’, असे जनतेला वाटल्यास त्यात चुकीचे काय !

आगशी (गोवा) येथे बैलाची अवैध वाहतूक रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण ! 

गोरक्षक किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी लक्षात आणून दिलेल्या घटनांच्या व्यतिरिक्त अशा आणखी कितीतरी घटना घडत असणार !

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणी अभ्यास समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.

भाजप, जनसंघ आणि रामजन्‍मभूमी आंदोलन यांचा इतिहास शिकवला जाणार !

नव्‍या राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापिठाच्‍या इतिहास अभ्‍यास मंडळाने इतिहासाच्‍या पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमाच्‍या चौथ्‍या ‘सेमिस्‍टर’च्‍या अभ्‍यासक्रमात पालट केला आहे.

डॉ. कुरुलकर पुन्‍हा पाकसमवेत संपर्क करण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे त्‍यांच्‍या जामिनाला विरोध !

संशोधन आणि विकास संस्‍थेचे संचालक अन् वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्‍तानला शस्‍त्रास्‍त्रे, तसेच क्षेपणास्‍त्रे यांची माहिती दिली. त्‍यांनी त्‍यांच्‍या भ्रमणभाषमधील माहितीही पुसली.