वर्ष २०३० पर्यंत आर्क्टिक महासागरातील हिमनद्या नष्ट होण्याची शक्यता !

भारतात वादळी पाऊस आणि पूर यांची शक्यता वाढली आहे. जंगलांचा र्‍हास होत आहे. पावसामुळे भूमी वाहून जात असून नद्या तुडुंब भरत आहेत.

(म्हणे) ‘आम्ही काश्मीरचे सूत्र जगाच्या प्रत्येक मंचावर उपस्थित करत रहाणारच !’-पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर अल हक काकड

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !

संयुक्त अरब अमिरातने भारताच्या मानचित्रात (नकाशात) पाकव्याप्त काश्मीर भारतात दाखवल्याने पाकचा थयथयाट !

संयुक्त अरब अमिरातकडे उत्तर मागण्याची पाकची पात्रता तरी आहे का ? जे सत्य आहे, ते कुणी मान्य करत असेल, तर त्यात चूक काय ?

क्रांतीकारक भगतसिंह यांच्या शिक्षेच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास लाहोर उच्च न्यायालयाचा नकार  

लाहोर उच्च न्यायालयाने क्रांतीकारक भगतसिंह यांना वर्ष १९३१ मध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करावी, अशी मागण्यात असलेली याचिका फेटाळून लावली. वर्ष २०१३ मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

लंडन येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ बंद !

लंडन येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ १७ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला. हा क्लब भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होता. या ठिकाणी अनेक स्वातंत्र्यसैनिकांसह क्रांतीकारकही राहिले होते.

चीनची आण्विक पाणबुडी बुडाल्याची चर्चा !

चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गेल्या २ आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. ऑगस्ट मासामध्ये चीनची आण्विक पाणबुडी तैवान येथील समुद्रात झालेल्या अपघातात बुडाली. यात १०० नौसैनिक होते. त्यांचा मृत्यू झाला.

(म्हणे) ‘नेपाळकडे आधीच वीज अल्प असतांना ती भारताला का विकत आहे ?’ – चीन

भारताची धोरणे नेहमीच नेपाळच्या हिताची राहिली आहेत. नेपाळला भारतापासून तोडण्याचा डाव नेपाळमधील चीनचा राजदूत करत आहे. हे षड्यंत्र लक्षात घ्या !

धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करा ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘प्रत्येक चिन्हातून सूक्ष्म सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. बहुतांश धार्मिक नेते त्यांच्या धार्मिक चिन्हांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांकडे लक्ष देत नाहीत आणि याचा प्रतिकूल परिणाम त्यांचे अनुयायी अन् भक्त यांवर होऊ शकतो.

ब्रिटनचे बर्मिंघम शहर दिवाळखोर होण्यामागे पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक !

संपूर्ण पाकिस्तानच आता आर्थिक दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यातूनच पाकिस्तान्यांची पात्रता काय आहे ?, हे जगाला लक्षात आले असेलच !

कॅनडाने भारतासमवेतच्या मुक्त व्यापारावरील चर्चा पुढे ढकलली !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भारतद्वेषी आणि खलिस्तानप्रेमी मानसिकता जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत कॅनडाकडून कोणतीही अपेक्षा करणे व्यर्थच म्हणावे लागेल !