केक आणि तलवार

तिथीनुसार वाढदिवस साजरा करतांना औक्षण केल्‍याने देवतेचे तत्त्व ज्‍याचा वाढदिवस आहे, त्‍याला मिळते. औक्षण करतांना श्रीरामरक्षेतील ‘शिरो मे राघवः पातु’ ते ‘विजयी विनयी भवेत’पर्यंतचे श्‍लोक म्‍हणावेत. त्‍यामुळे संपूर्ण शरिराभोवती संरक्षणकवच निर्माण होते.’

हिंदूंच्‍या श्रद्धा हा ‘फॅशन’चा विषय ?

सध्‍या बाजारात देवतांची चित्रे असलेल्‍या डिझायनर साड्या विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. दुर्दैवाने ‘फॅशन’ म्‍हणून कित्‍येक हिंदू स्‍त्रिया या साड्या अंगावर घेऊन मिरवत आहेत.

वारी : अध्‍यात्‍माचा प्रवास !

वारी वर्षातून एकदाच असते. त्‍यामुळे सततच ही आध्‍यात्मिक ऊर्जा मिळण्‍यासाठी, म्‍हणजे अध्‍यात्‍माचा हा प्रवास अखंड चालू ठेवण्‍यासाठी आणि आनंदी जीवन जगण्‍यासाठी तरुणांनी प्रतिदिन योग्‍य साधना करणे आवश्‍यक आहे.

नैराश्याचे उदात्तीकरण !

मेजवानीसारखे वरवरचे आणि क्षणिक उपाय करण्यापेक्षा मुलांचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी मुलांना काहीतरी उपासना किंवा साधना करायला सांगितले असते, तर त्यांचे आत्मिक बळ वाढून, सकारात्मकता येण्यास साहाय्य झाले असते.

व्‍यायामासाठी वेळ द्या !

निरोगी आरोग्‍याची किल्ली म्‍हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेदानुसार दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग म्‍हणजे योगाभ्‍यास किंवा व्‍यायाम. त्‍यामुळे प्रत्‍येकाने निरोगी आयुष्‍यासाठी आयुर्वेदानुसार दिनचर्या ठेवण्‍याचा प्रयत्न करून नियमित काही वेळ योगाभ्‍यासाला किंवा व्‍यायामाला देणे अत्‍यावश्‍यक आहे.

५३ वर्षांची प्रतीक्षा !

अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पास एवढा विलंब होण्यास उत्तरदायी असणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडूनच धरणासाठी झालेला अतिरिक्त खर्च वसूल करायला हवा, तसेच त्यासाठी उत्तरदायी असणार्‍या सर्व संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाईही झाली पाहिजे.

युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले ‘स्वराज्य’, म्हणजे एखादा राजकीय पक्ष काढण्यासारखे नव्हते, तर त्यामध्ये ‘सर्वसामान्यांपासून प्रत्येक स्तरावरच्या व्यक्तीला आपले वाटेल’, असे प्रजेचे ते राज्य होते आणि ते ज्या परिस्थितीमधून उभे राहिले, त्याला ‘एका नव्या युगाचा आरंभ’ असे म्हटले गेले.

विदेशी नको देशी झाडेच लावा !

देशी झाडांच्‍या लागवडीविषयी माहिती घेऊन प्रत्‍येक नागरिकाने पुढाकार घेऊन देशी अशा झाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे आणि पर्यावरण वाचवण्‍यात हातभार लावला पाहिजे ! तसेच सरकारच्‍या संबंधित विभागांना विदेशी झाडे लावण्‍यापासून परावृत्त करूया !

युवावर्गाचे कर्तव्य काय ?

एकूणच जगाची स्थिती पाहिल्यास कधीही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे युवावर्गाला राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देणे आणि करून घेणे आवश्यक आहे !

अधिकार्‍यांची मनमानी नको !

न्‍यून प्रमाणात पाणीपुरवठा झाल्‍याने सामान्‍यजन आणि शेतकरी यांचे होत असलेले हाल अधिकार्‍यांना दिसत नाहीत का ? अधिकार्‍यांचा केवळ स्‍वतःचा भ्रमणभाष परत मिळावा, एवढाच विचार का झाला ?