भारतातील किती हिंदु खेळाडू हिंदूंवरील अत्याचारांविषयी बोलतात ?

‘गाझावरील आक्रमणात ठार झालेल्या मुलांविषयी जग शांत आहे’, असे ट्वीट भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने केल्यावर पाकचा हिंदु धर्मीय माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पठाण याला पाकमधील हिंदूंविषयी बोलण्याचे आवाहन केले.

यावर भारतातील निधर्मीवादी गप्प का ?

भारतातील मशिदींमधून गोळा करण्यात आलेला पैसा जिहादी आतंकवादासाठी वापरण्यात येतो, अशी माहिती आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्‍या देशांवर कारवाई करणार्‍या ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या अहवालात म्हटले आहे.

शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा परिणाम !

देहलीमध्ये अपघातात घायाळ झालेल्या पियुष पाल या तरुणाच्या साहाय्यासाठी कुणीही पुढे न आल्याने त्याचा मृत्यू झाला. पियुष साहाय्य मागत असतांना लोक त्याचा व्हिडिओ बनवत होते. या कालावधीत चोरट्यांनी त्याचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप पळवला.

हमासच्‍या नेत्‍याच्‍या मुलाच्‍या प्रश्‍नाचे उत्तर मुसलमान देतील का ?

हिंदूंना अन्‍य धर्मियांच्‍या सहअस्‍तित्‍वाची अडचण नसते. ख्रिस्‍ती, ज्‍यू यांनाही नसते; मग प्रत्‍येक वेळी इस्‍लामवाद्यांकडूनच हिंसाचार का केला जातो ?, असा प्रश्‍न हमासच्‍या सहसंस्‍थापकाचा मुलगा मोसाब हसन यूसुफ याने उपस्‍थित केला आहे.

या वस्‍तूस्‍थितीविषयी निधर्मीवादी कधी बोलणार ?

चोरी, दरोडे, बलात्‍कार आदी गुन्‍ह्यांमध्‍ये आपण (मुसलमान) पहिल्‍या क्रमांकावर आहोत. कारागृहात जाण्‍यातही आपण पहिल्‍या क्रमांकावर आहोत, असे विधान ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम’ पक्षाचे प्रमुख आणि खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केले.

सोनिया गांधी काश्‍मीरच्‍या निष्‍पाप हिंदूंविषयी कधी बोलणार ?

काँग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रायल आणि हमास यांच्‍यातील युद्धावर ‘द हिंदु’ या दैनिकात लिहिलेल्‍या लेखात ‘इस्रायलकडून निष्‍पाप लोकांवर सूड उगवण्‍यात येत आहे’, अशी टीका केली आहे.

मशिदींचा वापर जिहादसाठी कसा होतो ?

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला २३ दिवस झाले आहेत. इस्रायलच्या आक्रमणात आतापर्यंत ३३ मशिदी नष्ट झाल्या आहेत.

हिंदूंनो, भविष्यातील संकट जाणा !

केरळच्या सरकारी बसमध्ये बुरखा घातलेल्या काही मुसलमान महिलांनी साडी नेसलेल्या एका हिंदु महिलेला तिने बुरखा न घातल्याने बसमध्ये चढण्यास विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

केरळच्‍या साम्‍यवादी सरकारचा हिंदुद्वेष !

‘चिरायंकीळू मंदिराच्‍या आवारात शस्‍त्रास्‍त्र प्रशिक्षण देण्‍यात येऊ नये’, या केरळ उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाचा आधार घेत राज्‍यातील मंदिरांच्‍या प्रांगणात रा.स्‍व. संघाच्‍या कार्यक्रमांवर बंदी घालण्‍याचा आदेश केरळ सरकारच्‍या देवस्‍वम् मंडळाने दिला आहे.

इस्‍लामी देशांत भारतियांवर अन्‍याय !

कतारमधील अल् दाहरा आस्‍थापनातील ८ भारतीय कर्मचार्‍यांना स्‍थानिक न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे कर्मचारी भारताच्‍या नौदलाचे माजी सैनिक आहेत. त्‍यांच्‍यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्‍याचा आरोप होता.