सर्वत्रच्‍या अशा पोलिसांवर कारवाई व्‍हावी !

पोलीस ठाण्‍यातील कोठडीत एका व्‍यक्‍तीला विनाकारण ३० मिनिटे डांबणार्‍या देहलीतील २ पोलीस उपनिरीक्षकांना देहली उच्‍च न्‍यायालयाने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. त्‍यांच्‍या वेतनातून हे पैसे वसूल करण्‍यात येणार आहेत.

भारतात हिंदूच असुरक्षित !

पुणे जिल्‍ह्यातील मंचर येथे सूरज चक्रधर या बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍याच्‍या घरावर धर्मांध मुसलमानांच्‍या जमावाने आक्रमण केले. ते घरी न सापडल्‍याने धर्मांधांनी घरातील महिलांना ठार मारण्‍याची धमकी दिली.

धर्मनिरपेक्ष देशातील काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंना ठेंगा !

अल्‍पसंख्‍यांकांना ४०० कोटी रुपये असलेले अनुदान ३ सहस्र कोटी रुपये केले आहे. माझ्‍या अधिकाराचा अवधी संपेपर्यंत १० सहस्र कोटी रुपये अनुदान देईन, असे कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी घोषित केले आहे.

अशा पत्रकारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

चीनकडून निधी मिळाल्‍याच्‍या आरोपांमुळे देहली पोलिसांनी ७ पत्रकारांच्‍या निवासस्‍थानांसह एकूण ३५ ठिकाणी धाडी घातल्‍या. हे पत्रकार ‘न्‍यूज क्‍लिक’ या वृत्तसंकेतस्‍थळाशी संबंधित आहेत.

मुसलमान गुन्‍हेगारांसाठी शरीयत कायदा लागू करा !

समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी देशातील बलात्‍कारांच्‍या घटना रोखण्‍यासाठी शरीयत कायदा लागू करण्‍याची मागणी केली आहे. ‘या कायद्यामुळे सौदी अरेबियामध्‍ये मुसलमानांच्‍या संदर्भात एकही गुन्‍हा घडत नाही’, असा दावा त्‍यांनी केला.

काश्‍मिरी मुसलमान विद्यार्थ्‍यांची देशविरोधी मानसिकता जाणा !

झाशी येथील बरुआसागर नवोदय विद्यालयाचे २० हिंदु विद्यार्थी काश्‍मीरमधील राजौरी नवोदय विद्यालयात शिकण्‍यासाठी गेले असता त्‍यांना तेथे मारहाण करण्‍यासह देशविरोधी घोषणाबाजी करायला भाग पाडले, तसेच देवतांची चित्रे फाडण्‍यात आली.

हिंदूबहुल भारतातील मंदिरेही असुरक्षित !

उन्नाव (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील बांगरमऊ गावात जावेद नावाच्या एका मुसलमान युवकाने येथील ऐतिहासिक बाबा बोधेश्वर महादेव मंदिरात घुसून ३ भाविकांवर लाठीने आक्रमण केले. यामध्ये ते गंभीररित्या घायाळ झाले.

याचा विचार हिंदू कधी करणार ?

पाकचे माजी क्रिकेटपटू मुश्‍ताक अहमद म्‍हणाले की, हैद्राबाद आणि अहमदाबाद येथे मुसलमानांची संख्‍या अधिक आहे. तेथे आपल्‍या संघाला भरपूर समर्थन मिळेल.

पाद्य्रांची वासनांधता जाणा !

जर्मनीमध्‍ये ७२ वर्षांपूर्वी अल्‍पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्‍याच्‍या प्रकरणी फ्रांज हेंगबस्‍क या कार्डिनलचा (पाद्य्रांचे एक पद) पुतळा बर्लिन येथील एसेन  ‘कॅथेड्रल’मधून (प्रमुख पाद्य्राचे स्‍थान असणारे चर्च) हटवण्‍यात आला.

देशद्रोही खलिस्‍तान्‍यांना ओळखा !

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी खलिस्‍तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी भारतावर आरोप केले आहेत. या आरोपांचे पंजाबमधील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने समर्थन केले आहे. तिने या संदर्भात एक प्रस्‍ताव संमत केला आहे.