पुणे येथील संत साई हायस्‍कूल येथे पाश्‍चात्त्य संस्‍कृतीला झुगारून ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा !

इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत हिंदु संस्‍कृतीची जोपासना केली जाणे हे स्‍तुत्‍य !

शिक्षक अधिवेशनानिमित्त पुणे जिल्‍ह्यातील एकही प्राथमिक शाळा बंद न ठेवण्‍याचा जिल्‍हा परिषदेचा आदेश !

जिल्‍ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना केवळ ‘शिक्षक अधिवेशना’स जाण्‍यासाठी रजा संमत केली जाईल; परंतु एकाच शाळेतील सर्वच शिक्षकांना रजा संमत केली जाणार नाही.

चंद्रभागा आणि इंद्रायणी नद्या स्‍वच्‍छ ठेवाव्‍यात ! – ह.भ.प. माऊली महाराज वाबळे, प्रसिद्ध कीर्तनकार

१९ फेब्रुवारी या दिवशी या सोहळ्‍याची सांगता कर्जत येथील ह.भ.प. प्रवीण महाराज फराट यांच्‍या कीर्तनाने होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी दिंडी सोहळा होणार असून विनामूल्‍य नेत्रचिकित्‍सा शिबिराचे आयोजनही करण्‍यात आले आहे.

पाकिस्‍तानच्‍या कारागृहात ७०० हून अधिक भारतीय नागरिक

पाकमध्‍ये खितपत पडलेल्‍या भारतियांना परत आणण्‍यासाठी काहीही न करणार्‍या आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय सरकारांसाठी हे लज्‍जास्‍पद होय ! आतातरी ही आकडेवारी पुढे आल्‍यावर भारत सरकारने त्‍यांच्‍या सुटकेसाठी कठोर पावले उचलणे आवश्‍यक !

भारत, हिंदु समाज आणि पंतप्रधान यांच्याविषयी द्वेष पसरवणार्‍या ‘बीबीसी’वर कठोर कारवाई करा !

गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘बीबीसी न्यूज’ने एका माहितीपटाद्वारे खोटी माहिती प्रसारित केली आहे. वास्तविक सर्वाेच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांना निर्दाेष म्हणून घोषित केले आहे.

तीर्थक्षेत्रांविषयी राजकारण्यांचे नव्हे, धर्मशास्त अभ्यासकांचे मत ग्राह्य धरावे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

इतिहास, धर्मशास्त्र, तीर्थक्षेत्र यांविषयी राजकीय व्यक्तींनी भाष्यच करू नये. हा अधिकार ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास करणार्‍यांचा किंवा धर्मशास्त्राच्या अभ्यासकांचा आहे- सुधीर मुनगंटीवार

पुणे येथील भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग खरे नसल्याचा आसाम सरकारचा दावा !

आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे सहावे ज्योतिर्लिंग आहे; मात्र ‘भीमाशंकरचे ज्योर्तिलिंग हे खरे नसून आसाममधील ज्योतिर्लिंग खरे आहे’, असा दावा आसाम सरकारने केला आहे.

गडदुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण नियोजित षड्यंत्र असल्याने पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवरील विशेष कार्यक्रमात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि शिवप्रेमी मल्हार पांडे यांची मुलाखत ! मुंबई, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्‍या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि … Read more

पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल ! – प.पू. अदृश्य काडसिद्देश्वर स्वामीजी

कोल्हापूर – कणेरी येथील सिद्धगिरी मठाने अध्यात्मासमवेत कृषी, पारंपरिक शिक्षक, आरोग्य, महिला सबलीकरण, संस्कृतीरक्षण, गोसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापक अशा प्रत्येक क्षेत्रांत ठसा उमटवला आहे. याच श्रृंखलेत पर्यावरण रक्षणासाठी आता होणारा पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल. २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार … Read more

न्यूझीलंडमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप

शहराच्या जवळ असलेल्या लोवर हट येथे भूकंपाचा तीव्र झटका जाणवला असून रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.१ एवढी नोंदवण्यात आली आहे. भूकंपानंतर कोणत्याही प्रकारची वित्तीय अथवा जीवित हानी झाल्याची माहिती प्राप्त मिळालेली नाही.