विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जाणार्‍या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठवणार ! – प्रकाश ढंग, महापालिका क्षेत्र अध्यक्ष, भाजप

ते पुढे म्हणाले की, भाजपचे ८ आणि महायुतीचे ३, असे ११ माजी नगरसेवक एकत्रच आहेत. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रसारासाठी ते कार्य करत आहेत.

लोहगाव (पुणे) विमानतळ देशामध्ये ९ व्या स्थानावर, तर देशांतर्गत प्रवासी वाहतुकीमध्ये ८ व्या स्थानावर !

२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये पुणे विमानतळावरून ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही संख्या पहाता गेल्या आर्थिक वर्षांमध्ये प्रवास करणार्‍या संख्येत १८ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशामध्ये ९ व्या स्थानावर आहे.

पुनावळे आणि चिखली येथील आर्.एम्.सी. प्रकल्पावर महापालिकेची कारवाई !

उघडउघड विनाअनुमती व्यवसाय होत असतांना प्रशासन काय करत होते ?

यवतमाळ येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेकीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा हिंदूंना लक्ष करण्याचा प्रयत्न !

‘गुन्हेगार कोण आहे ?’, हे आधीच घोषित करण्याची पुरोगाम्यांची जुनीच सवय !

खडकवासला कालव्यातून विनाअनुमती पाणी उपसा करणार्‍या ३ शेतकर्‍यांवर कारवाई !

२३ एप्रिल या दिवशी वरवंड, भिगवण आणि शिर्सुफळ येथील ३ शेतकर्‍यांवर कारवाई करण्यात आली. वरवंड आणि भिगवण येथे दरवाजा उघडून विनाअनुमती पाणीउपसा चालू असल्याचे निदर्शनास आले होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : महायुतीच्या उमेदवारांना विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही ! – मनसे; मुंबईत पुन्हा उष्णतेची लाट येणार !…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २७ आणि २८ एप्रिल या दिवशी मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेला तोंड द्यावे लागेल. या वेळी पारा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.

माझ्या जिवाला धोका ; सुरक्षा पुरवा ! – नेहाच्या वडिलांची मागणी

माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबाला शासनाने सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे  वडील निरंजन हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

RSS Shatabdi 2025 : रा.स्व. संघ शताब्दी वर्ष साजरे करणार नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

१०० वर्षे पूर्ण झाली म्हणून उत्सव करण्यासाठी आणि काही उपक्रमांचा गाजावाजा करायला संघ आला नाही. संघ समाजात पालट करू इच्छितो आणि मानतो की, समाजाच्या विजयाचे आकलन धन मिळवण्याने नाही, तर धर्मातून झाले पाहिजे !

मानेसर (हरियाणा) येथे ४०० वर्षे जुन्या भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांच्या मूर्ती सापडल्या !

मानेसर येथील बागनकी गावात एका भूखंडावर बांधकामासाठी चालू असलेल्या खोदकामाच्या वेळी ३ प्राचीन मूर्ती सापडल्या. यातील भगवान श्रीविष्णूची दीड फूट उंचीची, श्री लक्ष्मीदेवीची एक फूट उंचीची, तर तिसरी मूर्ती शेषशायी भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांची आहे.

Mamata Banerjee On CBI : सीबीआयने न्यायालय विकत घेतले आहे ! – ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची अधिवक्त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाकडे मागणी