यवतमाळ येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेकीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा हिंदूंना लक्ष करण्याचा प्रयत्न !

जितेंद्र आव्हाड

मुंबई – यवतमाळ येथील महात्मा फुले चौक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी शाईफेक केल्याची घटना २१ एप्रिल या दिवशी उघडकीस आली. हे कृत्य करणार्‍यांचा शोध पोलिसांकडून चालू आहे; मात्र गुन्हेगाराचा शोध लागलेला नसतांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘सनातनी मनुवाद्यांनो तुम्हाला त्यांचा राग जिवंत असतांनाही येत होता आणि मरणानंतरही येतो’ असे लिखाण प्रसारित करून हिंदूंना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी २३ एप्रिल या दिवशी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून याविषयी प्रसारित झालेले एका वर्तमानपत्रातील वृत्त आणि वरील संदेश प्रसारित केला आहे.

संपादकीय भूमिका

‘गुन्हेगार कोण आहे ?’, हे आधीच घोषित करण्याची पुरोगाम्यांची जुनीच सवय !