दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : महायुतीच्या उमेदवारांना विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही ! – मनसे; मुंबईत पुन्हा उष्णतेची लाट येणार !…

महायुतीच्या उमेदवारांना विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही ! – मनसे

मुंबई – वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे पाठिंबा घोषित केला आहे; मात्र मनसेच्या काही पदाधिकार्‍यांना महायुतीच्या पाठिंब्याला विरोध केला आहे. ‘ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे’, असे सांगण्यात आले आहे. मनसेचा पाठींबा महायुतीलाच असल्याची भूमिका २५ एप्रिल या दिवशी मनसेकडून घोषित करण्यात आली आहे.


मुंबईत पुन्हा उष्णतेची लाट येणार !

मुंबई – येथे पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २७ आणि २८ एप्रिल या दिवशी मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेला तोंड द्यावे लागेल. या वेळी पारा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो. ठाणे, रायगड या जिल्ह्यांतही तापमान वाढणार आहे. २७ ते २९ एप्रिल या तीन दिवसांत या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा बसतील. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १५ आणि १६ एप्रिल या दिवशी महामुंबईमध्ये अनेक ठिकाणी तापमानामध्ये वाढ झाली होती.