गोवा : अश्वे-मांद्रे किनारी भागातील अवैध पार्ट्या मांद्रे पंचायतीच्या सरपंचांनी बंद पाडल्या

अश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल एक मासासाठी अनुज्ञप्ती दिली आहे. सरपंचानी याविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना ‘अशी अनुज्ञप्ती देणे कायद्यात बसते का ?’ याचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.

गोवा : उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा १२ वाजता सुटल्या !

राज्यात उष्णतेच्या लाटेची नोंद घेऊन शिक्षण खात्याने ९ आणि १० मार्च या दिवशी शाळा १२ वाजेपर्यंत सोडाव्यात, असा आदेश काढला आणि ९ मार्च या दिवशी बहुतांश शाळा १२ वाजता सोडण्यात आल्या.

गोव्यात ठिकठिकाणी आगीच्या दुर्घटना : म्हादई अभयारण्य अजूनही धुमसत आहे !

वन क्षेत्रातील संभाव्य आगीचे प्रकार नियंत्रणात आणण्याच्या हेतूने वन खात्याच्या सज्जतेसाठी अग्नीशमन दलाने वर्ष २०२१ मध्ये काही शिफारसी केल्या होत्या. या सर्व दुर्घटनांवरून वन खात्याने या शिफारसींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

गड-दुर्ग रक्षणासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद !

विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी ९ मार्च या दिवशी महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३-२०२४ साठीचा १६ सहस्र १२२ कोटी रुपये महसुली तुटीचा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि धार्मिक संवर्धन करणारा अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्पातील विविध स्तरांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी !

शिवराज्याभिषेक महोत्सव आणि गड-दुर्ग संवर्धन यांसाठी ६५० कोटी रुपयांचा निधी !

अर्थसंकल्पाविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया…

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सिद्ध केलेला अर्थसंकल्प ! – अजित पवार

शिवनेरीवर तिथीप्रमाणे होणार्‍या शिवजयंती उत्सवाचे आयोजन !

या वेळी ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कारही देण्यात येणार असून सायंकाळी जुन्नर शहरातून पालखी मिरवणूक निघणार आहे.

वडगाव मावळ (पुणे) येथील अवैध दारूचा अड्डा महिलांनी केला उद्ध्वस्त !

वडगाव मावळ येथील रेल्वेस्थानकाच्या भागात चालणारा अवैध हातभट्टी दारूचा अड्डा ‘मोरया महिला प्रतिष्ठान’च्या रणरागिनींनी एकत्र येऊन उद्ध्वस्त केला. या दारूच्या अड्ड्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला यांना दारू पिणार्‍यांचा त्रास होत होता.

पुणे येथे ३ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास ८ वर्षांनी २१ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

३ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणार्‍या ३३ वर्षीय सागर चव्हाण यास विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी २१ वर्षे सक्तमजुरी आणि ३५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

रत्नागिरीत ५० रिक्शाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई

केवळ सणांच्या वेळी नव्हे, तर प्रत्येक वेळी अशी कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने करणे जनतेला अपेक्षित !