पुणे – ३ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणार्या ३३ वर्षीय सागर चव्हाण यास विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी २१ वर्षे सक्तमजुरी आणि ३५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात ११ एप्रिल २०१५ या दिवशी तक्रार दिली होती. या खटल्यात विशेष सरकारी अधिवक्ता लीना पाठक यांनी सरकार पक्षाकडून ९ साक्षीदारांची साक्ष नोंदवली, तसेच आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची विनंती पाठक यांनी युक्तिवादात केली होती. या खटल्यात पीडित बालिकेची साक्ष, आईची साक्ष, तसेच वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला.
संपादकीय भूमिका८ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |