शिवनेरीवर तिथीप्रमाणे होणार्‍या शिवजयंती उत्सवाचे आयोजन !

जुन्नर (पुणे) – शिवनेरीवर तिथीप्रमाणे साजर्‍या होणार्‍या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ‘शिवनेरी स्मारक समिती’ आणि ‘सह्याद्री गिरी भ्रमण संस्थे’च्या वतीने ३ दिवस दीपोत्सव, गड प्रदक्षिणा, शिवाई मातेस अभिषेक, छबिना आणि पालखी मिरवणूक, शिवजन्म सोहळा, ध्वजारोहण आणि शिव वंदना, पोवाडे, तसेच धर्मसभा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या वेळी ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कारही देण्यात येणार असून सायंकाळी जुन्नर शहरातून पालखी मिरवणूक निघणार आहे.