गोवा येथील कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळले : नागरिकांमध्ये संताप

निविदा न काढता नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याने हे काम प्रारंभापासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. व्यासपिठावरील अनेक पुरातन आणि दर्जेदार प्राचीन साहित्याची मोठी हानी झाली आहे.

नगर जिल्‍ह्यातील जिल्‍हा परिषदेच्‍या १६१ प्राथमिक शाळा विद्यार्थ्‍यांविना बंद पडण्‍याच्‍या स्‍थितीत !

जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील विद्यार्थ्‍यांची संख्‍या अल्‍प का होत आहे ? याचा अभ्‍यास होणे आवश्‍यक आहे. जिल्‍हा परिषदांच्‍या शाळांचा दर्जा खालावणे अपेक्षित नाही, त्‍यासाठी यावर लवकरात लवकर उपाययोजना निघायला हवी !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने अक्‍कलकोटसह ५ ठिकाणी हिंदूसंघटन मेळावे उत्‍साहात साजरे !

सध्‍या हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवून त्‍यांचे धर्मांतर केले जात आहे. त्‍यांच्‍यावर अत्‍याचार केले जात आहेत. हे थांबवण्‍यासाठी हिंदु मुली आणि महिला यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणी होणे आवश्‍यक आहे.

सरखेल कान्‍होजी आंग्रे यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त अभिवादन दुचाकी फेरी पार पडली !

फेरीचे उद़्‍घाटन कान्‍होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्‍या हस्‍ते दिवाळेगाव बंदर येथे करण्‍यात आले. १०५ स्‍वयंसेवकांनी नोंदणी करून यात सहभाग घेतला.

पुणे येथे घराबाहेर गणेशमूर्ती स्‍थापित केल्‍याने दांपत्‍याला ठोठावला साडेपाच लाखांचा दंड !

श्री. सतिश आणि सौ. संध्‍या होनावर या दांपत्‍याने वर्ष २००२ मध्‍ये सातव्‍या मजल्‍यावर घर खरेदी केले. घर खरेदी केल्‍यावर पुजार्‍याने त्‍यांना घराच्‍या बाहेर मूर्ती स्‍थापित करायला सांगितल्‍याने त्‍यांनी ती मूर्ती घराबाहेर स्‍थापित केली होती.

७० ते ७५ किलोच्‍या ७ सहस्र रुपयांच्‍या टोमॅटोची चोरी !

येथील कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती चोरांनी ७० ते ७५ किलोचे ७ सहस्र रुपयांचे टोमॅटो चोरले. हा प्रकार सीसीटीव्‍हीत दिसून आला आहे.

सरकारविरोधात विरोधकांचे आंदोलन !

या आंदोलनात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार समर्थक एकाही आमदाराची उपस्‍थिती नव्‍हती. ‘विरोधी पक्षनेते पदाच्‍या निवडीसाठी काँग्रेसच्‍या नेत्‍यांची बैठक चालू झाली आहे. विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच असेल’, असे बाळासाहेब थोरात यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अविश्‍वास ठराव प्रविष्‍ट केल्‍यानंतर उपसभापतींना पदावर बसण्‍याचा नैतिक अधिकार नाही ! – अनिल परब, आमदार, ठाकरे गट

विधान परिषदेच्‍या उपसभापती म्‍हणून डॉ. नीलम गोर्‍हे काम पहात आहेत. त्‍यांनी स्‍वत:हून पक्षाचे सदस्‍यत्‍व सोडलेले आहे. १० व्‍या परिशिष्‍टातील कायद्याच्‍या २ ‘अ’ मध्‍ये अपात्रतेची तरतूद आहे. त्‍याअंतर्गत आम्‍ही त्‍यांच्‍या विरोधात अपात्रतेची याचिका प्रविष्‍ट केली आहे.

पाशवी बहुमताच्‍या बळावर विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

महाविकास आघाडीच्‍या सर्व आमदारांनी विधानसभेचे कामकाज स्‍थगित झाल्‍यानंतर राज्‍यपालांची भेट घेतली. राज्‍यपालांनी याविषयी सकारात्‍मक चर्चा केली असून आम्‍ही त्‍यांच्‍या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत, असेही ते म्‍हणाले.

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी अधिवेशनात पावले उचलू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

लव्‍ह जिहाद विरोधी कायदा निर्माण होणे आवश्‍यक आहे. यंदाच्‍या विधानसभा अधिवेशनात या कायद्याच्‍या संदर्भात पुढचे पाऊल उचलले जाईल. सत्तेत नव्‍याने सहभागी झालेल्‍या अजित पवार यांचाही हिंदुत्‍ववादी सरकारला पाठिंबा आहे.