शिरूर (जिल्हा पुणे) येथील बनावट डॉक्टरने ‘औषध दुकानासाठी जागा देतो’, असे सांगून फसवले !

शिरूर (जिल्हा पुणे) – येथील श्री मोरया मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील बनावट डॉक्टर मेहबूब शेख याने रुग्णालयाच्या इमारतीतील एक गाळा औषधाचे दुकान काढण्यासाठी देतो, असे सांगून चंदन नारखेडे यांना फसवले आहे. डिपॉझिट म्हणून ३० लाख रुपये घेऊन त्यातील २४ लाख रुपये परत न देता फसवणूक केली आहे. याविषयी चंदन नारखेडे यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली होती. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती रांजणगाव पोलिसांनी दिली.