गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७ एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

पोर्तुगिजांच्या काळात नष्ट केलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीला प्रारंभ ! –  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर केलेल्या अत्याचाराच्या खुणा पुसून हिंदु धर्म, संस्कृती यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य शासकीय स्तरावर आरंभ करणारे डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन ! 

गोव्यात ठिकठिकाणी हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी सामूहिक गुढीपूजन आणि शोभायात्रा यांचे आयोजन

राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग

गोवा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले खातेवाटप

शपथविधी कार्यक्रमानंतर अखेर ६ दिवसांनी खातेवाटप करण्यात आले. राज्यपालांच्या संमतीनंतर खातेवाटपाची अधिसूचना प्रसिद्ध केली. अजून तिघांचा मंत्रीमंडळात समावेश व्हायचा आहे. आता सर्वांचे लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !

या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्हीच आम्हा सर्व साधकांना साधना करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शक्ती, बुद्धी, चैतन्य अन् आध्यात्मिक बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्यात आली.

पोर्तुगिजांनी विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद

गोव्याप्रमाणेच भारतातील अन्य राज्यांत मोगल, इंग्रज यांनी विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने कृती करावी, हीच अपेक्षा !

हिंदू रक्षा महाआघाडीच्या नववर्ष स्वागतफेर्‍यांत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ! – प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन

गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतानिमित्त काढण्यात येणार्‍या प्रभातफेर्‍या आणि सभा यांच्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, तसेच प्रत्येक घर, आस्थापने अन् मंदिरात भगवा ध्वज किंवा गुढी किंवा पताका उभारावी, असे आवाहन येथे करण्यात आले.

राष्ट्रपतींच्या हस्ते तपोभूमी पिठाधीश सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना पद्मश्री प्रदान

२८ मार्चला भारताचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी श्री दत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्‍वर तथा आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना पद्मश्री पुरस्कार २०२२ राष्ट्र्रपती भवन दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ९ मंत्री शपथबद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ९ मंत्र्यांनी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात २८ मार्च या दिवशी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पद आणि गोपनीयता यांची शपथ घेतली.

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरसई (गोवा) येथे २७ मार्च या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ संपन्न झाली. या सभेचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .