‘कोव्हिशिल्ड’ लसीचा परिणाम ३ मासांत अल्प होऊ लागत असल्याने ‘बूस्टर डोस’ आवश्यक ! – संशोधक

भारतात बहुतांश लोकांनी ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतली आहे. त्यामुळे हा अहवाल भारतियांसाठी चिंता वाढवणारा आहे.

पाकमधून ७ सहस्र नागरिकांचा भारताची नागरिकता मिळण्यासाठी अर्ज ! – केंद्र सरकारची माहिती

वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताची नागरिकता देण्यात आली, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत.

मांझी यांची जीभ कापणार्‍याला ११ लाख रुपये देण्याची घोषणा करणारे भाजपचे नेते गजेंद्र झा निलंबित

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी केले होते हिंदु देवता आणि ब्राह्मण यांच्याविषयी अवमानकारक विधान !

पाकमध्ये सत्र न्यायालयाच्या आवारातून दिवसाढवळ्या हिंदु महिलेचे अपहरण

पाकमधील हिंदूंची ही स्थिती पालटण्यासाठी भारत सरकार कधी प्रयत्न करणार ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात येतो !

केंद्र सरकारच्या आदेशानंतर यू ट्यूबवरून प्रसारित होणार्‍या भारतविरोधी २० वाहिन्या आणि २ संकेतस्थळे यांच्यावर बंदी !

‘गूगल’ची मालकी असलेल्या यूट्यूबने भारतविरोधी विचार पसरवणार्‍या २० वाहिन्यांवर बंदी घातली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले ! – केंद्रीय अर्थमंत्री

देशातील अनेक बँकांची सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या व्यावसायिकांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत !

राज्य सरकार शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवू शकते ! – केंद्र सरकार

जगप्रसिद्ध वैज्ञानिक त्यांच्या शोधकार्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेला आधार मानतात, तर स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बहुसंख्यांक हिंदूंच्या देशामध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ती शिकवली जात नाही, हे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना अन् हिंदूंना लज्जास्पद !

भारतात गाढवांच्या संख्येत झपाट्याने घट ! – सर्वेक्षणाची माहिती

वर्ष २०१२ आणि वर्ष २०१९ पशूगणना या कालावधीत भारतातील गाढवांच्या संख्येमध्ये एकूण ६१.२३ टक्के घट नोंदवली गेली आहे.

केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला धार्मिक स्थळांच्या सुरक्षेविषयी सतर्कतेची चेतावणी

केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबमधील सर्व गुरुद्वारा, मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. देशविरोधी घटक पंजाबमध्ये धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करू शकतात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.