विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले ! – केंद्रीय अर्थमंत्री

डावीकडून विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी

नवी देहली – देशातील अनेक अधिकोषांची (बँकांची) सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेले व्यावसायिक नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या यांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या ७ वर्षांत ५ लाख ४९ सहस्र कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी लोकसभेत दिली.

विजय मल्ल्या यांच्यावर अनेक बँकांचे एकूण ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेसह अनेक बँकांची १३ सहस्र कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.