|
नवी देहली – देशातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जाऊ शकते, असे केंद्र सरकारने संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे.
राज्य स्कूलों में अब श्रीमद्भगवद गीता और भोजपुरी भाषा पढ़ाया जा सकता है, संसद से मंजूरी #news #dailyhunt https://t.co/tEs8YsxRpg
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) December 21, 2021
मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विचारले होते, ‘देशातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा सरकार विचार करत आहे का ?’ यावर केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले की, राज्यघटनेनुसार ‘शिक्षण’ हा राज्य सरकारांचा विषय आहे. जर राज्य सरकारला वाटते की, श्रीमद्भगवद्गीता शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जावी, तर सरकार तसे करू शकते. सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सी.बी.एस्.ई.) यांच्या अभ्यासक्रमामध्ये ७ वी आणि ८ वीच्या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीतेचा काही भाग शिकवला जात आहे.