पालेभाज्या : समज-अपसमज !
‘आपल्याला पालेभाज्या मुद्दाम आणि भरपूर किंवा प्रतिदिन खायची आवश्यकता नसते. ‘जेव्हा खायच्या, तेव्हाही आधी वाफवून, पिळून आणि तेल किंवा तूप यांची फोडणी देऊनच खाव्यात’, असे शास्त्रात सांगितले आहे.
‘आपल्याला पालेभाज्या मुद्दाम आणि भरपूर किंवा प्रतिदिन खायची आवश्यकता नसते. ‘जेव्हा खायच्या, तेव्हाही आधी वाफवून, पिळून आणि तेल किंवा तूप यांची फोडणी देऊनच खाव्यात’, असे शास्त्रात सांगितले आहे.
कोणत्याही मोठ्या रोगामुळे आलेला थकवा यांमध्ये अडूळसा, कडूनिंब, निर्गुंडी यांपैकी कोणत्याही एका वनस्पतीची मूठभर पाने अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये घालून अंघोळ करावी. शक्य असल्यास अंघोळीसाठी पाणी तापवतांनाच त्यामध्ये पाने घालावीत.
१०० वर्षे निरोगी जीवनासाठी प्रतिदिन सकाळी अंघोळीपूर्वी अंगाला तेल लावावे. हे शक्य न झाल्यास आठवड्यातून दोनदा आणि तेही शक्य नसेल, तर आठवड्यातून एकदा तरी प्रत्येकाने सर्वांगाला तेल लावावेच. यासाठी कोणतेही खाद्य तेल चालते.
‘मान, खांदा इत्यादी भागांसाठीचे थोडा वेळ करण्याचे व्यायाम आणि फार श्रम होत नाहीत’, असे व्यायाम’, म्हणजे ‘सूक्ष्म व्यायाम’. सूक्ष्म व्यायामांच्या संबंधी नियम पाळण्याची आवश्यकता नाही.’
पाद (पाय) हे कर्मेंद्रिय असून त्यांमध्ये श्रीविष्णूंचे अधिष्ठान असते. त्यामुळे पाय स्वच्छ धुवून ते पुसावेत आणि मग त्यांना तेल लावावे. यामुळे शरीर, मन, इंद्रिये आणि बुद्धी यांची निर्णयक्षमता वाढून अनेक चांगले परिणाम साधले जातात अन् स्वतःची कार्यक्षमता वाढते.
कोणत्याही प्रकारच्या खोकल्यामध्ये चहाचा पाव चमचा सुंठ चूर्ण तेवढ्याच मधात मिसळून ४ – ५ दिवस दिवसातून ४ वेळा चाटून खावे. मध उपलब्ध नसल्यास चमचाभर पाण्यात कालवून चाटावे. खोकल्यावरील हे नामी औषध आहे.
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अॅलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
एकाएकी झोपेच्या वेळांमध्ये पालट केल्याने काही वेळा ‘झोप पूर्ण झाली नाही’, असे होऊ शकते. त्यामुळे एकाएकी पालट न करता झोपेची वेळ टप्प्याटप्प्याने अलीकडे आणावी.’
वारंवार खाण्याची सवय लागली असेल, तर ती हळूहळू सोडावी आणि आयुर्वेदाचा गाभा असलेल्या ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे आणि सकाळी स्वतःच्या क्षमतेनुसार भरपूर व्यायाम करणे’, या दोन चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात.’