Delhi Blast : फरीदाबाद (हरियाणा) येथील अल्-फलाह विद्यापिठाची १४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

देहली बाँबस्फोटाच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई

फरीदाबाद (हरियाणा) : देहलीतील बाँबस्फोटाच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडीने) फरीदाबादमधील अल्-फलाह विद्यापिठाची अनुमाने १४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात धौज परिसरातील ५४ एकर भूमी, विद्यापिठाची इमारत, शाळा आणि विभाग यांच्या इमारती, तसेच वसतीगृहे यांचा समावेश आहे.

तसेच ‘अल्-फलाह ग्रुप’चे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी आणि त्यांचा ट्रस्ट यांच्याविरुद्ध आरोपपत्रही प्रविष्ट (दाखल) केले आहे. ही कारवाई आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आली आहे.

या विद्यापिठाचा डॉक्टर उमर उन नबी याने १० नोव्हेंबर २०२५ ला देहलीतील  लाल किल्ल्याजवळ चारचाकी गाडीमध्ये स्फोट घडवला होता. यात १५ लोकांचा मृत्यू झाला होता.