चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील चितगावमधील दागनभुइयां येथे धर्मांध मुसलमानांनी २८ वर्षीय हिंदु रिक्शाचालक युवक समीर कुमार दास याची मारहाण करून आणि चाकूने भोसकून हत्या केली. त्याची रिक्शाही चोरून नेण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाबाहेर समीर दास याचा मृतदेह आढळून आला. चोरीतून झालेली ही हत्या असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
१. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार समीर ११ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता रिक्शा घेऊन घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध चालू केला. रात्री २ वाजता जगतपूर गावातील एका शेतात स्थानिक लोकांना त्याचा मृतदेह आढळला.
२. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे दिसत आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Another Hindu murdered in Bangladesh’s Chittagong – police rush to brand it “theft.”
That’s 12 Hindu killings in one month.
When Muhammad Yunus claims this isn’t religious hatred, the state machinery follows – downplaying crimes and shielding Islamist fanaticism.
Whitewash… https://t.co/Eu530W9F7K pic.twitter.com/I4rxgUc2Vw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 13, 2026
महिन्याभरात १२ हिंदूंची हत्या !
गेल्या एका महिन्यात बांगलादेशात १२ हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने आरोप केला की, २ आठवड्यांपासून बांगलादेशामधील अल्पसंख्यांकांवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. एका हिंदु विधवेवर बलात्काराची घटना घडली, हिंदूंच्या दागिन्यांच्या दुकानाची लूट झाली, कुरीग्राम जिल्ह्यात हिंदु निवडणूक अधिकार्याला काम करण्यापासून रोखण्यात आले, अशा एक ना अनेक घटना घडल्या आहेत.
(म्हणे) ‘हिंदूंच्या होत असलेल्या हत्या धार्मिक द्वेषापायी नाहीत !’ – महंमद युनूस
संघटनेने पुढे म्हटले की, बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने अल्पसंख्यांकांच्या हत्यांचा निषेध केला असला, तरी वारंवार घडणार्या या घटनांना ते धार्मिक द्वेष म्हणण्यास सिद्ध नाहीत. मृतांचा वाढलेला आकडा हा केवळ अपवाद आहे.
संपादकीय भूमिका
|
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !