
बेंगळुरू (कर्नाटक) – शहरातील प्रथितयश ‘व्हाईटफील्ड’ परिसरातील एका इमारतीतील भाड्याने राहून शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीवर सैबुल नावाच्या वासनांधाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे पहाटे चहा पिण्यासाठी इमारतीबाहेर आली. जवळच असलेल्या चहाच्या दुकानाच्या दिशेने ती चालत जात होती. या वेळी सैबुलने अचानक तिच्यावर आक्रमण केले आणि तिला उचलून एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तरुणीने मोठ्याने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने साहाय्यासाठी धावून आले. हे पहाताच सैबुल पळून गेला. घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी काही वेळातच आरोपीला अटक केली. सैबुल रस्त्याच्या कडेला कचरा वेचण्याचे काम करतो, अशी माहिती पोलीस तपासात समोर आले आहे.
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम