अबू आझमी यांची हिंदुद्वेषी गरळओक !

मुंबई – जिहाद हा अत्यंत आदरणीय शब्द असून संघर्षाला ‘जिहाद’ म्हणतात. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड (भूमी) जिहाद’, हे सर्व मूर्खपणाचे प्रकार आहेत. ‘लँड जिहाद’ हा शब्द काल्पनिक आहे. हिंदु-मुसलमान विवाह जुन्या काळापासून होत असून यात केवळ प्रेम असते. भारतात कोणतीही मुसलमान संघटना हिंदु मुलींना फसवून आणण्यास सांगत नाही, तर उलट हिंदु संघटनाच यासाठी पैसे देतात, असे अत्यंत हास्यास्पद आणि वास्तवाकडे डोळेझाक करणारे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले. उलट त्यांनी हिंदु संघटनांवरच मुसलमान मुलींना आमिषे दाखवून लग्न लावण्याचा जाणीवपूर्वक आरोप केला आहे.
🚨 Nandurbar, Maharashtra: Abu Azmi dismisses concerns over ‘Love Jihad’ and ‘Land Jihad’ as mere “foolishness” – another example of his anti-Hindu rhetoric.
Cases linked to ‘Love Jihad’ have been highlighted through investigations, court observations, and even films like The… pic.twitter.com/QYFU9aSu0J
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 5, 2026
ते पुढे म्हणाले की, आपल्या देशाचे संविधान सांगते की, १८ वर्षांनंतर व्यक्ती स्वतंत्र असते, ती कोणत्याही धर्मात जाऊ शकते आणि तिला जेथे वाटेल त्याच्याशी विवाह करू शकते; पण आता मात्र जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. (संविधानाच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदूंच्या मुली आणि भूमी धोक्यात आणणार्या जिहादी कारवायांचे समर्थन करणे, हे अबू आझमी यांच्यासारख्या नेत्यांचे जुनेच धोरण आहे ! – संपादक)
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय