Mani Shankar Aiyar : (म्हणे) ‘ऑपरेशन सिंदूर’ संपवून पाकसमवेत चर्चा करा !’ – काँग्रेसचे पाकप्रेमी नेते मणीशंकर अय्यर

मणीशंकर अय्यर

नवी देहली : भारताने त्वरित ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवावे आणि पाकिस्तानसमवेत कोणत्याही विलंबाविना चर्चा केली पाहिजे, असे विधान काँग्रेसचे पाकप्रेमी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर यांनी केले आहे. भाजपने यावर कठोर टीका केली आहे.

काँग्रेस ‘इस्लामाबाद नॅशनल काँग्रेस’ झाली आहे ! – भाजप

शहजाद पूनावाला

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले की, काँग्रेस ‘इस्लामाबाद नॅशनल काँग्रेस’ झाली आहे. काँग्रेस वारंवार पाकिस्तानला निर्दोष ठरवते आणि आतंकवादाच्या विरोधातील कठोर कारवाईचा विरोध करते. काँग्रेसची ओळख ‘पाक माझा भाईजान, सैन्याचा करा अपमान’, अशी झाली आहे.

(म्हणे) ‘प्रत्येकाला स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार !’ – माकप

हन्नान मोल्लाह

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपचे) नेते हन्नान मोल्लाह यांनी अय्यर यांच्या विधानावर म्हटले की, हे एक तर्कसंगत मत आहे. प्रत्येकाला स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हे त्यांचे मत आहे. जर यात काही तथ्य असेल, तर लोक ते स्वीकारतील; जर नसेल, तर लोक ते नाकारतील. (माकप पक्षाची मानसिकता नेहमीच भारतविरोधी राहिल्याने अशा पक्षावर आता बंदीच घालणे आवश्यक ठरले आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मणीशंकर यांचा इतिहास पाकप्रेमीच राहिलेला असल्याने ते आतापर्यंत कारागृहात असणे आवश्यक होते. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !