बांगलादेशात आणखी एका हिंदूचा मृत्यू
ढाका (बांगलादेश) – नाओगाव जिल्ह्यातील हाट चकगौरी बाजार परिसरात मिथुन सरकार (वय २५ वर्षे) या हिंदु तरुणावर चोरीचा आरोप करत धर्मांध मुसलमानांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मिथुन याने बचावासाठी जवळच्या कालव्यात उडी मारली; मात्र यात त्याचा बुडून मृत्यू झाला. तो भंडारपूर गावातील रहिवासी होता. ४ घंट्यांनंतर मिथुनचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. मिथुन खरोखरच चोरीत सहभागी होता कि नाही ?, याची पोलिसांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.
🚨 Mob Justice. Minority Targeted. Life Lost. 🚨
📍Naogaon, Hat Chakgouri Bazar, Bangladesh
A Hindu youth, chased by a mob over theft allegations, jumped into a canal and died in
⚠️ Another Hindu death in Bangladesh
🩸 11 Hindus murdered in just 35 days
How many more… https://t.co/5QEATCMazj pic.twitter.com/anNwJYW4qB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 7, 2026
बांग्लादेशात ३५ दिवसांत ११ हिंदूंची हत्या !

बांग्लादेशात मागील ३५ दिवसांत ११ हिंदूंची हत्या झाली आहे. या व्यक्तीरिक्त अनेक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे झाली. केवळ डिसेंबर महिन्यात अशा ५१ घटना नोंदवल्या गेल्या. अलीकडेच नरसिंगदी येथे ४० वर्षांचे हिंदु व्यापारी शरत चक्रवर्ती मणि यांची धर्मांध मुसलमानांनी धारदार शस्त्रांद्वारे हत्या केली. या हत्येचा व्यापार्यांनी निषेध केला. बाजार बंद ठेवण्यात आला आणि न्यायाच्या मागणीसाठी मानवी साखळी उभी करण्यात आली. मारेकर्यांना शोधून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. हिंदूंनी निषेध व्यक्त करूनही बांग्लादेशात हिंदूंच्या हत्या चालूच आहेत. कट्टरतावाद्यांविरुद्ध आवाज उठवला, तर जीव द्यावा लागत आहे.
१. २ डिसेंबर २०२५ या दिवशी ४२ वर्षांचे प्रतोष कर्मकार यांची नरसिंगदी येथील रायपूरा येथे गोळी मारून हत्या करण्यात आली. त्याच दिवशी ३५ वर्षांचे मासळी व्यापारी उत्पल सरकार यांचीही हत्या झाली. ते फरीदपूर जिल्ह्यातील साल्था येथील रहिवासी होते.
२. ७ डिसेंबरला स्वातंत्र्यसैनिक आणि बांगलादेश मुक्ती संग्राम १९७१ मधील योद्धा जोगेशचंद्र राय आणि त्यांची पत्नी सुबोर्णा राय यांची घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना रंगपूर येथे घडली.
३. १२ डिसेंबर या दिवशी कुमिल्लातील १८ वर्षांचे रिक्शाचालक शांत दास यांची हत्या करण्यात आली. त्यांचा गळा चिरून मृतदेह एका शेतात टाकण्यात आला.
४. १८ डिसेंबरला २७ वर्षांचे हिंदु युवक दीपू दास यांना कारखान्यातून ओढून काढून जमावाने मारहाण करून ठार मारले. नंतर त्यांचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला. ही घटना मायमनसिंहमधील भालुका येथे घडली.
५. २४ डिसेंबरला राजबारी जिल्ह्यात अमृत मंडल यांची मारहाण करून हत्या झाली. २९ डिसेंबरला अर्धसैनिक दल अन्सार वाहिनीतील हिंदु सदस्य बजेंद्र विश्वास यांना गोळी मारण्यात आली. ही घटना मायमनसिंह परिसरात घडली.
६. ३ जानेवारीला हिंदु व्यापारी खोकनचंद्र दास यांच्यावर ते घरी जात असतांना चाकूने आक्रमण करण्यात आले. त्यानंतर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले.
७. ५ जानेवारीला स्थानिक दैनिकाचे कार्यकारी संपादक आणि बर्फ कारखान्याचे मालक राणा प्रताप बैरागी यांची गोळी मारून हत्या झाली. त्यानंतर ६ जानेवारीला शरत चक्रवर्ती यांचीही कट्टरतावाद्यांनी हत्या केली.

तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !