|

नवी देहली : राष्ट्रद्रोही घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात काही विद्यार्थी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कबर ‘जे.एन्.यू.’च्या भूमीवर खोदली जाईल’, अशा प्रकारच्या चिथावणीखोर घोषणा देत असल्याचे त्यात दिसत आहेत. हे विद्यार्थी उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन नाकारल्याच्या सूत्रावरून निषेध करत असल्याचे सांगितले जात आहे.
१. सामाजिक माध्यमांत प्रसारित झालेल्या या ३५ सेकंदांच्या व्हिडिओवरून विद्यार्थी संघटनेने, तसेच काँग्रेसने त्या विद्यार्थ्यांना पाठीशी घातले आहे.
२. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा अदिती मिश्रा यांनी सांगितले की, प्रतिवर्षी विद्यार्थी ५ जानेवारी २०२० या दिवशी विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी निदर्शने करतात. सर्व घोषणा वैचारिक होत्या आणि त्या कुणावरही वैयक्तिक आक्रमण नव्हते. त्या कुणालाही उद्देशून नव्हत्या. (मिश्रा यांचे या वक्तव्यावर एखाद्या शेंबड्या पोराचा तरी विश्वास बसेल का – संपादक)
३. घोषणांवरून काँग्रेस नेते उदित राज म्हणाले की, हा राग व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्यासमवेत असे यासाठी केले जात आहे; कारण ते मुसलमान आहेत.
काय घडले होते ५ जानेवारी २०२० या दिवशी ?जवाहरलाल नेहरू विद्यापिठात या दिवशी हिंसाचार उसळला होता. मुखवटा घातलेल्या काही लोकांनी विद्यापिठातील ३ वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य केले होते. त्यांच्यावर लाठ्या, दगड आणि लोखंडी सळ्या यांद्वारे आक्रमण केले. यात किमान २८ लोक घायाळ झाले होते. हिंसाचार करणार्यांवर कारवाई न केल्याचा आरोप देहली पोलिसांवर करण्यात आला होता. त्याच कालावधीत झालेल्या देहली दंगलीच्या प्रकरणात शरजील इमाम २८ जानेवारीपासून आणि उमर खालिद १३ सप्टेंबर २०२० पासून कोठडीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ५ जानेवारी २०२५ या दिवशी त्या दोघांची जामीन याचिका फेटाळून लावली. |
SHOCKING, JNU Leftists Chant DEATH THREATS 🚨
Modi-Shah ki kabr khudegi, JNU ki dharti parOpenly threatening Indian PM & HM, right after SC denied bail to Umar Khalid & Sharjeel Imam for their role in 2020 Delhi Riots
Court upheld law based on evidence. These radicals respond… pic.twitter.com/JNTTJEJgF3
— Voice of Hindus (@Warlock_Shubh) January 6, 2026
संपादकीय भूमिका
|
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin