
कोल्हापूर, २३ डिसेंबर (वार्ता.) : ‘नाताळ’ जवळ आला की, भारतातील बहुतांश शहरांत चौकाचौकांत ‘सांताक्लॉज’च्या टोप्या विकणारे मोठ्या प्रमाणात दिसायला लागतात. हिंदु असूनही स्वतःला ‘पुरोगामी’ आणि ‘सर्वधर्मसमभावी’ म्हणवणारी मंडळी स्वतः आणि आपल्या मुलांना या टोप्या घेऊन ‘सांताक्लॉज’ मुले झोपल्यावर येतो आणि त्यांच्यासाठी ‘भेटवस्तू’ ठेवून जातो’, ही भ्रामक कथा सांगून मुलांचे सांस्कृतिक धर्मांतर करण्याला आरंभ करतात; पण खरंच ‘सांताक्लॉज’ होऊन गेला का ? ‘सांताक्लॉज’ येऊन मुलांना खरंच कुणी भेटवस्तू देतो का ? ‘या ‘सांता’विषयी ख्रिस्ती धर्मीयांचीच काय धारणा आहे ?’, याचा हिंदु समाज काही विचार न करता या भूलथापांना भूलून हिंदु मुलांना अंधश्रद्धेच्या आहारी नेत आहेत. इतर वेळी हिंदूंच्या देवतांना ‘थोतांड’ म्हणणारे आणि हिंदु प्रथा-परंपरांना विरोध करणारे या वेळी गप्प का आहेत ? आम्ही समस्त हिंदु समाजाकडून आव्हान देत आहोत, ‘खरा सांताक्लॉज येतो, हे सिद्ध करा आणि १ लाख रुपये मिळवा !’ जर हे खोटे आहे, तर मुलांना भुलवू नका, असे आव्हान ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे तालुका संयोजक श्री. नितीन काकडे यांनी दिले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
🚨 Don’t Mislead Children on ‘Santa Claus’ – Prove a real Santa visits children & win ₹1 lakh. – Hindu Rashtra Samanvay Samiti
📍 At a Kolhapur press meet, coordinator Nitin Kakade issued a challenge
🔎 Even Christian voices admit this:
• Antonio Staglianò: Santa is… pic.twitter.com/14sZJmjfRJ— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 23, 2025
या वेळी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’चे राष्ट्रीय महामंत्री श्री. पराग फडणीस, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते. श्री. काकडे पुढे म्हणाले की, ‘सांताक्लॉज’विषयी ख्रिस्ती धर्मगुरूंनीच काय म्हटले आहे ? ते अतिशय धक्कादायक आहे. यातील काहीच जणांची वक्तव्ये कळली, तरी यातील खोटेपणा लक्षात येईल.
| हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे प्रसिद्धीपत्रक –
|
‘सांताक्लॉज’विषयी ख्रिस्त्यांनी वक्त केलेले मत
१. इटलीतील बिशप (वरिष्ठ पाद्री) अँटोनियो स्टॅग्लियानो सांता क्लॉजच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणतात, ‘सांताक्लॉज हा एक काल्पनिक चेहरा असून कोका-कोला आस्थापनाने त्याच्या उत्पादनांच्या विज्ञापनासाठी त्याचा वापर केला आहे !’
२. अमेरिकेतील प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक आणि पाद्री मार्क ड्रीस्कॉल यांनी ‘सांताक्लॉज’हा पालकांना स्वत:च्या मुलांशी खोटे बोलण्यास भाग पाडणारा ‘ख्रिसमसचा राक्षस’ आहे. ‘सांता अस्तित्वात आहे’, असे मुलांना खोटे सांगणे, हे त्यांच्या विश्वासाला तडा देण्यासारखे आहे,’ असे म्हटले आहे.
३. ख्रिस्त्यांच्या ४ प्रमुख चर्चसंस्थांपैकी ‘ऑर्थोडॉक्स चर्च’मध्ये ‘सांताक्लॉज’ ही संकल्पना जवळजवळ पूर्णपणे नाकारली जाते. रशिया, ग्रीस अशा देशांतील ऑर्थोडॉक्स चर्च सांताऐवजी ‘सेंट बेसिल’ किंवा ‘फादर फ्रॉस्ट’ यांना मानतात. त्यांच्या मते, ‘सांताक्लॉज’ हा बाजारपेठेने निर्माण केलेला एक भ्रम आहे, ज्याचा ऑर्थोडॉक्स आध्यात्मिक परंपरेशी संबंध नाही. ‘अँग्लिकन चर्च’च्या मते ‘सांता ही मनोरंजक कथा असून ख्रिसमसचा केंद्रबिंदू नाही’, तर ‘प्रोटेस्टंट संस्था’ सांताक्लॉजला ‘मूर्तीपूजा’ किंवा ‘अंधश्रद्धा’ मानतात.

अंनिस ख्रिस्ती अंधश्रद्धांच्या संदर्भात मूग गिळून गप्प का ?ख्रिस्ती धर्मगुरु आणि संस्थाच सांताक्लॉजला ‘थोतांड’ म्हणत असतांना हिंदूंनी त्याचा उदो उदो का करायचा ? वेळीच सावध व्हा, आपल्या मुलांवर हिंदु धर्मानुसार संस्कार करा. लहानपणीच त्यांच्यावर ख्रिस्ती अंधश्रद्धा लादू नका. एरवी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मश्रद्धांना लक्ष्य करणारी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ख्रिस्ती अंधश्रद्धांच्या बाबतीत मूग गिळून बसली आहे का ? ‘अंनिस’ला ‘सांता’मध्ये कोणता पुरोगामीपणा किंवा विज्ञानवादी दृष्टीकोन दिसतो, हे त्यांनी घोषित करावे, असे आव्हानही हिंदु राष्ट्र समन्वय समितीने दिले आहे. |
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !