हिंदूंच्या देवतांविषयी अपमानास्पद व्हिडिओ प्रसारित केल्याचे प्रकरण

नवी देहली : ‘एक्स’वर हिंदु धर्माच्या विरोधात अपमानास्पद आणि चिथावणीखोर लिखाण केल्याच्या आरोपावरून निर्देश सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी येथील साकेत न्यायालयात केली आहे. यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला आहे. २३ मार्चला यावर पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता मकरंद आडकर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली हे सूत्र न्यायालयात मांडण्यात आले. या प्रकरणात सिंह यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १९६, २९९ आणि ३५३ अंतर्गत धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच हिंदु धर्माचा अपमान केल्याचे आरोप करण्यात आले.

🚨 Delhi Court Reserves Order on Insult to Hindu Deities
Adv. @SachdevaAmita has moved Saket Court seeking an FIR against Nirdesh Singh for posting abusive content on X mocking Hindu deities, Maha Kumbh Ganga Snan & Holi.
🛡️ Amita ji: Defending Dharma Through Law
• 531+… https://t.co/bnlMbTBk3l pic.twitter.com/BEi3QNuDno— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 21, 2025
निर्देश सिंह यांनी श्रीराम, श्रीकृष्ण आणि ब्रह्मदेव यांच्यासह हिंदूंच्या अनेक देवतांची थट्टा करणारे अनेक व्हिडिओ आणि संदेश सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केले. महाकुंभातील गंगानदीतील स्नान आणि होळी यांसारख्या पवित्र धार्मिक परंपरांविषयीही अवमानकारक विधाने त्यांनी केली होती. गंगानदीतील स्नानाची तुलना सांडपाण्यात केलेल्या स्नानाशी करणे, हिंदु धर्मग्रंथांवर ढोंगीपणाचा आरोप करणे आणि होळीला ‘महिलांवरील हिंसेचा उत्सव’ म्हणून चुकीचे चित्रण करणे अशा माहितीचा या व्हिडिओंमध्ये समावेश आहे.
Is there inconsistency in enforcing hate speech laws in India? Supreme Court directives mandate suo moto action irrespective of religion, yet calls to eradicate Sanatan Dharma faced no immediate suo moto action despite complaints, while other cases see varying enforcement, and… pic.twitter.com/Z6kt38509O
— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) December 21, 2025
हे ही वाचा →
♦ Nirdesh Singh Arrested Hate Speech : हिंदूंच्या देवता आणि महाकुंभमेळा यांना शिवीगाळ करणार्या निर्देश सिंह हिला अटक
♦ Nirdesh Singh Hate Speech : (म्हणे) ‘महाकुंभ म्हणजे अश्लीलता; श्रीकृष्ण, श्रीराम गुन्हेगार !’
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी तात्काळ गुन्हा नोंदवणे, सखोल अन्वेषण चालू करणे आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करणे, अशा मागण्या याचिकेद्वारे केल्या आहेत. द्वेषमूलक लिखाणाला आळा घालणे आणि सामाजिक सलोखा जपणे हा या याचिकेचा उद्देश आहे.
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी केलेले कार्य![]() अधिवक्त्या अमिता सचदेवा यांच्या जनहित याचिकेमुळे यू ट्यूबवरून पवित्र घाटांवरील महिला आणि अल्पवयीन मुली यांचे आक्षेपार्ह दृश्य असलेली ५३१ हून अधिक व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. तसेच पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात हिंदूंच्या देवता, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतीय सेना यांच्याविषयी अवमानकारक लिखाण केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात अधिवक्त्या सचदेवा यांनी यश मिळवलेले आहे. ही ट्विटस पहा → ♦ https://x.com/SachdevaAmita/status/1826582125291995240 ♦ https://x.com/SachdevaAmita/status/1826995432687595941 हे ही वाचा → WALMART Denigration ShriGanesha : ‘वॉलमार्ट’ आस्थापनाकडून अंतर्वस्त्रांवर श्री गणेशाचे चित्र प्रसिद्ध |

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !