वॉलमार्टच्या विरोधात देहलीतील साकेत न्यायालयात अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी प्रविष्ट केली याचिका

नवी देहली : अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी आंतरराष्ट्रीय आस्थापन ‘वॉलमार्ट’ आणि तिचे भारतीय संचालक यांच्या विरोधात येथील साकेत न्यायालयात दाद मागितली आहे. श्रीगणेशाचे चित्र छापलेली दैनंदिन वापरातील अंतर्वस्त्रे, जलक्रीडा पोशाख, चपला आणि मोजे विक्रीस काढून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
👉 ⚖️ STANDING FOR DHARMA THROUGH LAW
Delhi: Advocate @SachdevaAmita has moved Saket Court against @Walmart for selling innerwear bearing Lord Ganesh’s image.
👉 This is how advocates must protect Dharma – lawfully and fearlessly.
If any other faith were targeted, outrage… pic.twitter.com/O2Agd8qWs3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 22, 2025

सनातन धर्माच्या संरक्षणासाठी नेहमीच सक्रीय भूमिका घेणार्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी भारतीय न्याय संहितेतील कलम १९६ आणि २९९ अंतर्गत तक्रार नोंदवली आहे. ही कलमे समाजामध्ये वैर निर्माण करणे आणि धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावणे यासंदर्भात आहेत. १६ डिसेंबर या दिवशी अंतिम युक्तीवाद झाला असून ज्येष्ठ अधिवक्ता मकरंद आडकर यांनी अधिवक्त्या अमिता सचदेवा यांची बाजू मांडली आहे. न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे.

काय आहे प्रकरण ?
६ डिसेंबर २०२४ या दिवशी हिंदु जनजागृती समितीने सामाजिक माध्यमांवर ‘वॉलमार्ट’च्या ‘सेलेशियल गणेश ब्लेसिंग्स’ या संग्रहाविषयी प्रसिद्ध केलेली माहिती अधिवक्त्या अमिता सचदेवा यांच्या निदर्शनास आली.
या संग्रहात हिंदूंच्या देवतेचे चित्र अंतर्वस्त्रे आणि पादत्राणे यांवर वापरण्यात आले होते. कोट्यवधी हिंदूंच्या दृष्टीने हे अत्यंत अनुचित आणि अपमानास्पद होते.
सामाजिक माध्यमांवरील तीव्र संतापानंतर वॉलमार्टने दुसर्याच दिवशी ही उत्पादने संकेतस्थळावरून हटवली; मात्र ही पहिलीच वेळ नव्हती. वर्ष २०१८ मध्ये हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा असलेली अंगठी विक्रीस काढल्यानेही वाद निर्माण झाला होता आणि त्या वेळीही उत्पादने मागे घ्यावी लागली होती. |
हे ही वाचा → PIL Hindu Gods Denigration : आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार्या याचिकेवरील निर्णय देहली न्यायालयाने राखून ठेवला !
पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी सांगितले की,
वॉलमार्टकडून हीच चूक दुसर्यांदा करण्यात आली आहे. केवळ उत्पादने हटवणे पुरेसे नाही. कायदेशीर परिणाम नसतील, तर अशी आस्थापने भारतीय कायदे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना यांकडे तुच्छतेने पहात रहातील. ६ डिसेंबर २०२४ या दिवशी सायबर शाखेकडे गुन्ह्याची तक्रार आणि २० डिसेंबर या दिवशी दक्षिण देहलीचे उपायुक्त यांच्याकडे निवेदन देऊनही गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यामुळे न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली.
(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिका
|

मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले