तमिळनाडूतील द्रमुक सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही थिरुपरंकुंद्रम् डोंगरावर दीपम् प्रज्वलित करण्यास अनुमती नाकारल्याने उचलले पाऊल

मदुराई (तमिळनाडू) – येथे ४० वर्षांच्या पूर्णा चंद्रन् नावाच्या व्यक्तीने प्रथम पेरियार यांच्या पुतळ्याजवळ स्वतःचे वाहन थांबवले त्यानंतर जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात प्रवेश करून स्वतःला पेटवले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळातच पूर्णा चंद्रन यांची ध्वनीफिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. ही ध्वनीफी त्यांची स्वतः मृत्यूपूर्वी ध्वनीमुद्रित केली होती. त्यामध्ये त्यांनी ‘थिरुपरंकुंद्रम् डोंगरावर दीपम् प्रज्वलित करण्यास अनुमती न मिळाल्याने मी अत्यंत व्यथित झालो आहे. मंदिराचे पावित्र्य भंग होऊ नये; म्हणून तेथे स्वतःला पेटवून न घेता शहरात जाऊन स्वतःला पेटवून घेण्याचा निर्णय घेत आहे’, असेही त्यांनी नमूद केले.
TN BJP chief @NainarBJP linked the death of 40-year-old devotee to the DMK government’s defiance of High Court orders by blocking Kartigai Deepam at Thiruparankundram, calling it a grave apathy toward Hindu faith.
He demanded a government job for the victim’s wife, ₹1 crore… https://t.co/J28ugS4hAR pic.twitter.com/R7WX1woqWV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 20, 2025
काय आहे प्रकरण ?तमिळनाडूतील थिरुपरंकुंद्रम डोंगर भगवान मुरुगनांच्या ६ पवित्र स्थळांपैकी एक मानला जातो. येथे प्रतिवर्षी कार्तिकेय दीपम् प्रज्वलित करण्याच्या परंपरेवरून दीर्घकाळापासून वाद चालू आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने १ डिसेंबर २०२५ या दिवशी दीपस्तंभावर दीपम् प्रज्वलित करण्याचे निर्देश दिले होते; मात्र राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था आणि परंपरा यांचा आधार घेत यास अनुमती दिली नाही. या डोंगरावर दर्गा असल्याने दीपम्ला विरोध केला जात आहे. पूर्णा चंद्रन् नियमितपणे धार्मिक स्थळांना भेट देणारे होते. मंदिराची अपकीर्ती होऊ नये, अशी त्याची इच्छा होती. सरकारने न्यायालयाचा आदेश कार्यान्वित न केल्याने ते कोलमडले. कुटुंबियांना त्याच्या हेतूची कोणतीही कल्पना नव्हती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि २ लहान मुले आहेत. ते वैद्यकीय प्रतिनिधी होते. |
भाजपची द्रमुक सरकारवर टीका
या घटनेनंतर तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष नैनार नागेंद्रन् आणि नेते के. अण्णामलाई यांनी यास द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरकारच्या हिंदूविरोधी धोरणाचा परिणाम म्हटले; मात्र त्यांनी भाविकांना शांतता राखण्याचे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे आवाहनही केले.
संपादकीय भूमिका
|
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत