|


भारत मंडपम, देहली (वार्ता.) – श्रीराम मंदिरासाठी हिंदूंनी न्यायालयाबाहेर दिलेला लढा अपूर्व आहे; मात्र आम्ही अधिवक्त्यांनी त्याविषयी न्यायालयात दिलेला लढा म्हणजे श्रीरामाने आम्हा सर्वांसाठी दिलेली त्याच्या अस्तित्वाची अनुभूतीच आहे. श्रीरामाच्या कृपेमुळेच ऋषितुल्य ज्येष्ठ अधिवक्ता केशव परासरन् यांनी वयाच्या ९२ व्या वर्षीही हा लढा जोमाने दिला. त्यांच्यात दुर्दम्य श्रद्धा निर्माण करणाराही श्रीरामच ! मी अधिवक्ता परासरन् यांना वर्ष २०१७ मध्ये जोडला गेलो; मात्र या संपूर्ण खटल्यामुळे ‘जीवनात ‘योगायोग’ कधीच असत नाही, तर केवळ दैवी कृपाच असते’, असे माझे ठाम मत झाले, असे भावपूर्ण प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांनी केले.
‘भारत मंडपम’ येथे चालू असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त १३ डिसेंबरला आयोजित ‘मंदिररक्षण चर्चासत्रा’मध्ये ते बोलत होते. या चर्चासत्रात तंजावूर, तमिळनाडू येथील श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दैवी अंशांचे जतन करणार्या कुटुंबातील वेदप्रचाररत्न वेदकुलपती श्री. जी.के. सीतारामन्, कर्नाटकातील श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक आणि मंदिर महासंघाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट सहभागी झाले होते. प्रख्यात वृत्तनिवेदिका श्वेता त्रिपाठी यांनी या प्रसंगी सूत्रसंचालन केले.
चर्चासत्राच्या प्रारंभी सनातन संस्थेचे अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचा सत्कार केला. त्यानंतर श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दैवी अंशांच्या संदर्भात माहितीपर लघुपट दाखवण्यात आला. या वेळी अधिवक्ता श्रीधर पोतराजू आणि श्री. जी.के. सीतारामन् यांनी सांगितलेल्या अनुभूती ऐकून धर्मप्रेमी मंत्रमुग्ध झाले.
अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांनी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे . . .![]() १. खटल्याची सलग ४० दिवस सुनावणी चालू होती, तेव्हा अधिवक्ता परासरन् यांना वयोमानानुसार चालता येत नव्हते. त्यांना आम्ही चाकांच्या आसंदीवरून न्यायचो. त्यांना कृत्रिम दात, कानात ऐकण्यासाठीचे यंत्र बसवले होते. गुडघेदुखीचा त्रास होत असूनही त्यांनी चिकाटी सोडली नाही. हे ही वाचा → अयोध्या प्रकरणातील निकाल सर्वांना स्वीकारार्ह होता, त्यामुळे देशात शांतता राखली गेली ! – Former Justice Nageswara Rao २.अधिवक्ता परासरन् सांगायचे की, त्यांना त्यांच्या एका खांद्यावर श्रीकृष्ण आणि एका खांद्यावर श्रीराम बसून ‘तेच सर्व न्यायालयात सुचवत आहेत’, असे जाणवते. ३. विरोधी पक्षाने ‘एकदा बांधलेली मशीद ही कायम मशीदच असते’, असे सांगितल्यावर त्याचा प्रतिवाद कसा करायचा, याविषयी आम्ही गोंधळलो होतो; मात्र तेव्हा अधिवक्ता परासरन् यांनी निक्षून सांगितले, ‘एकदा बांधलेले मंदिर हे सदा मंदिरच रहाते !’ हे ही वाचा → ४. खटल्याच्या वेळी सोबत असलेले सहअधिवक्ता योगेश्वरन् आणि भक्तीवर्धन सिंग हे येणार्या प्रत्येक प्रश्नावर ज्या ग्रंथात हात घालत, तेथे संबंधित प्रश्नांची उत्तरे देणारे पुरावे मिळत. ५. या खटल्यात अचानक पुरातत्व विभागाने ‘ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार’ (भूमीच्या खालील भागाची रडारद्वारे पडताळणी करणे) चाचणी करण्याची मागणी केली. त्यातूनही ‘तेथे भूमीखाली मंदिर होते’, हेच सिद्ध झाले. या खटल्यातील प्रत्येक गोष्ट रामच घडवत होता. ६. हा खटला म्हणजे हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. ‘सनातन संस्कृती जिवंत आहे’, हे सिद्ध करण्याची लढाई होती. (यांचे सविस्तर भाषण लवकरच प्रसिद्ध करत आहोत. – संपादक) |
आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करायचे आहे ! – वेदप्रचाररत्न वेदकुलपती श्री. जी.के. सीतारामन्, तंजावूर, तमिळनाडू
माझ्या अनेक पिढ्यांनी हे श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अंश जपून ठेवून त्याची नित्यपूजा केली. मलाही हे काय आहे, ते ठाऊक नव्हते, तरी मी १८ वर्षे त्यांचे पूजन करत आलो. त्यानंतर या अंशांमधील चुंबकीय शक्तीविषयी संशोधन करण्यासाठी मी अनेक प्रयोगशाळेत हे अंश पाठवले होते; मात्र माझे गुरुस्वरूप शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी मला थांबवले. त्यांनी सांगितले, ‘हे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अंश आहेत.’ ३० जानेवारी २०२६ पासून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनानुसार या अंशांच्या भारतभरातील दर्शनयात्रेला रामेश्वरम् येथून प्रारंभ होईल. मी गेली ३० वर्षे ३६० विद्यार्थ्यांना वेद शिकवले. अाता माझी पत्नी निवर्तल्यामुळे मी आता नित्य अग्निहोत्र आदी विधींतून मोकळा झालो. मुलगा वेदपाठशाळेचे कार्य पहात असल्याने मला आता ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे. ज्यांना या श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगांचे दर्शन हवे असेल, त्यांनी आम्हाला संपर्क करावा, आम्ही त्यांच्याकडे येऊन ते देण्याची व्यवस्था करू.
मंदिरांच्या रक्षणार्थ शासनकर्त्यांनीही सहकार्य करावे ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

कर्नाटकातील चिक्कमंगळुरू येथून ३० किलोमीटर अंतरावर असलेले ठिकाण म्हणजे दत्तपीठ ! या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रेयाने साधना केली होती; मात्र टिपू सुलतानाने तेथे बाबा बुडन दर्गा स्थापन केला. त्यानंतर तेथील शेकडो एकर परिसराचे मजारी, थडगी, दफनभूमी, दर्गा, गोमांसभक्षण यांमुळे इस्लामीकरण झाले होते; मात्र गेली ३० वर्षे विश्व हिंदु परिषद, श्रीराम सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेली आंदोलने आणि दिलेला न्यायालयीन लढा यांमुळे ९० टक्के परिसर दत्तभक्तांचा बनला आहे. आता केवळ शुक्रवारी नमाजपठण करायला मौलवी येतो. तेही लवकरच न्यायालयाच्या आदेशाने बंद होईल. मंदिरे हिंदूंचे जीवन आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी आजच्या शासनकर्त्यांनीही साहाय्य करायला हवे ! जर वल्लभभाई पटेल एक शासकीय आदेश काढून धर्मांधांनी पाडलेले श्री सोमनाथ मंदिर पुन्हा बांधू शकतात, तर त्याच धर्तीवर आज सर्व मंदिरांचे रक्षण झाले पाहिजे. हिंदूंनी यापुढे आपल्याला धर्मांधांना तोंड देण्यासाठी लढण्याची सिद्धता ठेवावी, असे मी आवाहन करतो.
मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यरत ‘मंदिर महासंघ’ ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरातील परंपरांचे रक्षण, मंदिरांचे रक्षण, मंदिरा-मंदिरांमध्ये समन्वय, मंदिरांचे संघटन, मंदिरे हीच धर्मशिक्षणाची केंद्रे या पंचसूत्रीनुसार ‘मंदिर महासंघा’चे कार्य चालू आहे. गेल्या ३ वर्षांत मंदिर महासंघाच्या माध्यमातून १५ सहस्र मंदिरांच्या प्रतिनिधींचे संघटन केले असून २ सहस्र ३०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मुंबईतील मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून केवळ देशातच नव्हे, तर ऑस्ट्रेलियासारख्या देशातही वस्त्रसंहिता लागू झाली. वर्ष २००८ मध्ये महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस शासनाने साडे ४ लाख मंदिरे कह्यात घेण्यासाठी कायदा सिद्ध केला होता; मात्र महासंघाने संघटितपणे केलेल्या विरोधामुळे तो कायदा बासनात गुंडाळून ठेवावा लागला. आजही कर्नाटकच्या काँग्रेस शासनाने मंदिरांवर कर लावण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद येथे कायदा पारित केला होता; मात्र महासंघाच्या विरोधामुळे राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही. मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक आठवड्याला २० सहस्र हिंदू आरतीसाठी एकत्र येतात. एकूणच मंदिरे ही हिंदूंची आधारशिला आहेत. त्यामुळे त्यांचे रक्षण करण्यासाठी एक होणे, हे आपले धर्मकर्तव्यच आहे.

UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !