‘१५.४.२०२६ या दिवशी माझे मोठ्या आतड्याचे शस्त्रकर्म झाले. भगवान श्रीकृष्ण, धन्वन्तरि देवता आणि गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या कृपेने माझे मोठे शस्त्रकर्म पार पडले. शस्त्रकर्माच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडणे
‘१४.४.२०२६ या दिवशी मी रुग्णालयात भरती झाले. दुसर्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मला शस्त्रकर्मगृहात नेले. माझी प्रार्थना चालू होती. माझे शस्त्रकर्म अनुमाने ६ घंटे चालले. माझे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘स्वीकारण्याची वृत्ती’ हे सूत्र आचरणात आणण्यासाठी केलेले प्रयत्न
२ अ. शस्त्रकर्मानंतर पोटातील वात (वायू) बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करणे : शस्त्रकर्म झाल्याच्या तिसर्या दिवशी शल्यविशारद असलेल्या आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘आता तुमच्या पोटातून वात बाहेर पडायला हवा.’’ संध्याकाळपर्यंत माझ्या पोटातून वात बाहेर सरकला नव्हता. त्यामुळे संध्याकाळपासून ‘माझ्या पोटातून वात पुढे का सरकत नाही ?’, या विचारांनी मी पुष्कळ अस्वस्थ झाले होते. मी सतत श्रीकृष्णाला प्रार्थना करत होते, ‘तूच माझ्या आतड्यातील वात पुढे सरकवण्यास साहाय्य कर.’
२ आ. पोटातील वात बाहेर न पडल्याने झोप न लागणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात सांगितलेले ‘स्वीकारण्याच्या वृत्ती’ संदर्भातील सूत्र अकस्मात् लक्षात येणे : १८.४.२०२६ या दिवशी पहाटेचे ३ वाजले असतांना माझे मन केवळ ‘वात पुढे सरकणे’ या विचाराभोवती फिरत होते. त्यामुळे मला झोप लागत नव्हती. काही वेळाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात सांगितलेल्या ‘स्वीकारण्याच्या वृत्ती’च्या संदर्भातील सूत्रे अकस्मात् मला आठवली.
२ इ. साधिकेने शारीरिक व्याधी, वेदना आणि शस्त्रकर्म प्रारब्धभोग म्हणून स्वीकारणे; मात्र शस्त्रकर्मानंतर वात पुढे न सरकल्याने अस्वस्थ होणे अन् स्वतःच्या विचारांची जाणीव होताच तो विचार सोडून देणे : माझी ‘शारीरिक व्याधी, आतड्याचा विकार, पोटात प्रचंड कळा येऊन दुखणे’ हे सगळे प्रारब्धभोग मी शांतपणे स्वीकारले होते. यावर शस्त्रकर्म हाच उपाय असल्यामुळे तोही शांतपणे स्वीकारला होता. मी मोठ्या गोष्टींचा सहजतेने स्वीकार केला आणि केवळ ‘आजच्या दिवसात वात पुढे सरकत नाही; म्हणून मी इतकी अस्वस्थ का झाले आहे ? आजची माझी ही शारीरिक स्थिती मला का स्वीकारता येत नाही ?’, असा विचार मी करत होते. त्यानंतर माझ्या मनातील ‘वात पुढे सरकणे’ या संदर्भातील विचार गेला आणि पहाटे मला शांतपणे झोप लागली.
२ ई. वर्तमानात राहून परिस्थिती स्वीकारणे : त्यानंतर प्रत्येक दिवशी मी वर्तमानात राहू शकले. माझे सर्व शरीरधर्म (मल-मूत्रविसर्जन) हे पूर्वपदावर येईपर्यंत मी प्रतिदिन माझी शारीरिक स्थिती स्वीकारत होते. त्यामुळे माझे शरीर पुष्कळ लवकर पूर्वस्थितीत आले.
३. शस्त्रकर्मानंतर ऐकलेल्या भक्तीसत्संगात सांगितलेले ‘देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला साहाय्य करतो’, हे सूत्र ऐकल्यावर साधिकेला तिच्या शस्त्रकर्माच्या वेळी घडलेल्या घटनांचा कार्यकारणभाव लक्षात येणे
माझे शस्त्रकर्म झाल्यावर दुसर्या दिवशीही माझ्यावर गुंगीचा थोडासा प्रभाव होता. १९.४.२०२६ या दिवशी मी भक्तीसत्संग ऐकला. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी संत वेणाबाई यांची कथा सांगितली. त्या कथेच्या निरूपणात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला साहाय्य करतो. कधी एखादी अनोळखी व्यक्ती अकस्मात् येऊन साहाय्य करते.’’ हे ऐकता क्षणी माझ्या लक्षात आले आणि माझ्या शस्त्रकर्माच्या वेळी घडलेल्या घटनांचा कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला.
३ अ. मानवी बुद्धीच्या पलीकडील ईश्वरी नियोजन अनुभवणे : माझी शाळेतील अतिशय जिवलग मैत्रीण आधुनिक वैद्य आहे. ती पुण्यात एका नामांकित रुग्णालयात अतीदक्षता विभागाची संचालक आहे. माझ्या शस्त्रकर्माला केवळ २ दिवस शेष असतांना मी पुण्यातील माझ्या त्या मैत्रिणीला कळवल्यावर ती अल्प कालावधीत गोव्याला आली. शस्त्रकर्माच्या वेळी भूल देतात, त्या संदर्भात माझे मन साशंक होते. मला भूल देणार्या भूलतज्ञ या पुण्यातील माझ्या त्या आधुनिक वैद्य असलेल्या मैत्रिणीच्या रुग्णालयात शिकलेल्या सहकारी होत्या. शस्त्रकर्म करणार्या शल्यविशारदांना साहाय्यक म्हणून आलेली आधुनिक वैद्या हीही माझी मैत्रीण होती. हे ईश्वरी नियोजनच होते. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. हे सर्व ईश्वरी नियोजन मानवी बुद्धीच्या पलीकडील आहे.
४. ‘आपल्या आयुष्यात जे घडते, ते पूर्ण स्वीकारून शरणागतीने प्रार्थना करायला हवी. आपले गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि ईश्वर यांच्या कृपेने सर्वकाही व्यवस्थित पार पडते’, हे मला शिकायला मिळाले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तीनही मोक्षगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘गुरुदेव तव महनीय कृपा !’
– एक साधिका, मडगाव, गोवा. (१२.५.२०२६)
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
तळमळीने सेवा करणारे आणि रोगाचे अचूक निदान करण्याची दैवी शक्ती लाभल्याने साधकांचा मोठा आधार असणारे रत्नागिरी येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कै. मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
श्रीरामरक्षास्तोत्रात ‘एकटेपणा जाणवणे’ आणि ‘असुरक्षित वाटणे’ या समस्यांच्या निवारणाचा उपाय असणे