‘मे २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी तेथे आलेले सनातनचे संत आणि सद्गुरु यांच्या वागण्यात वात्सल्यभाव जाणवल्याने मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या भक्तवत्सल रूपाचे दर्शन घडले. याविषयी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. पू. (कु.) दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या संत, वय ३६ वर्षे)

पू. दीपाली मतकर ‘सोलापूरहून गोवा येथे महोत्सवासाठी आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना त्यांच्या नियोजित निवासस्थानी जाण्यासाठी गाडी मिळाली का ? ते निवासस्थानी व्यवस्थित पोचले का ?’, यांचा आढावा घेत होत्या. हिंदुत्वनिष्ठ व्यवस्थित पोचल्याचा निरोप मिळाल्यावर त्यांना बरे वाटले. त्या वेळी त्यांच्यातील तळमळ पाहून ‘त्या स्वतःला विसरल्या आहेत’, असे मला जाणवत होते.
२. पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४९ वर्षे)

महोत्सवाच्या दुसर्या दिवशी पू. रमानंदअण्णा ‘कर्नाटक येथून आलेल्या धर्मनिष्ठांना त्यांच्या निवासस्थानी पोचवण्यासाठी काय व्यवस्था केली आहे ?’, अशी विचारपूस करत होते.
३. सद्गुरु स्वाती खाडये (वय ४७ वर्षे)

महोत्सवाच्या दुसर्या दिवशी कार्यक्रम संपल्यानंतर सद्गुरु स्वातीताई स्वतः मुख्य प्रवेशद्वारावर उभ्या राहून ‘सर्व साधक आणि धर्मप्रेमी यांची सोय योग्य प्रकारे होत आहे ना ? कुणाला काही अडचण नाही ना ?’, हे पहात होत्या.
४. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (वय ५८ वर्षे)

महोत्सवानंतर सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाका घाईत होते, तरीही त्यांनी त्यांच्यासाठी थांबलेल्या हिंदुत्वनिष्ठांना भेटून प्रेमभावाने त्यांची विचारपूस केली. बांगलादेश येथून आलेले पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष (वय ७१ वर्षे) सद्गुरु पिंगळेकाकांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले असता सद्गुरु पिंगळेकाकांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.
‘हे गुरुराया, ‘वरील विविध प्रसंगांतून आपण मला आपल्या भक्तवत्सल रूपाचे दर्शन घडवले, तसेच वरील सर्व लिखाण आपणच माझ्याकडून लिहून घेतले’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– एक साधक, कुडाळ सेवाकेंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.७.२०२५)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !