
शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिरात प्रात्यक्षिके दाखवतांना हिंदु जनजागृती समितीचे प्रशिक्षक !

हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग घेणार्या प्रशिक्षकांकडून या शिबिरात उपस्थित शिबिरार्थींना स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्याचप्रमाणे व्यायामप्रकार करवून घेण्यात आले.
⚔️ Awakening the Inner Warrior! 🚩🔥
‘Savyasachi Gurukulam’ volunteers showcased Shiv-era warfare techniques at the Shaurya Jagruti camp – reviving the spirit of courage and discipline.
💪 “O Hindu woman, you are not weak. Become strong… become a Ranaragini!” 🚩🔥… https://t.co/FwgBMtM8i1 pic.twitter.com/99LYyCu9aA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 9, 2025
शौर्यजागृती शिबिरात शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके दाखवतांना ‘सव्यासाची गुरुकुलम्’चे वीर आणि वीरांगना !

‘सव्यसाची गुरुकुलम्’ या संस्थेकडून शिवकालीन युद्धकलेचे जतन आणि जोपासना होते. या युद्धकलेतील अंगावर काटा आणणारे, लढाऊ वृत्ती जागृत करणारे प्रकार या वेळी प्रशिक्षणार्थींना दाखवण्यात आले.
वीरांगना छत्रपती महाराणी ताराबाईंचा आदर्श ठेवा !

औरंगजेबाला सळो कि पळो करून सोडणार्या आणि कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळणार्या कोल्हापूर येथील छत्रपती महाराणी ताराबाई यांचा आदर्श ठेवून आजचे जिहादी, वासनांध यांना तेवढ्याच धाडसाने अन् तळमळीने तोंड देण्यासाठी सिद्ध होत आहेत शौर्यजागृती शिबिरातील रणरागिणी !
उपस्थित मान्यवर


भाजपच्या वंदना बंबलवाड, वैद्या अश्विनी माळकर, पोलीस मित्र अर्चना गुरव, उद्योजक श्री. जयंतीलाल पटेल, ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, हिंदु महासभेच्या रश्मी साळोखे, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु जागरणचे धर्मप्रचारक श्री. सनी पेनकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे श्री. विकास जाधव आणि श्री. प्रशांत पाटील, श्री. अमर जाधव, हिंदु महासभेच्या शीला माने, ‘हिंदु एकता आंदोलना’चे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे श्री. आनंदराव काशीद, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, ‘इस्कॉन’चे श्री. दीपक खोत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, श्री. अर्जुन आंबी

या शिबिरात हुबळी ते कोल्हापूर हे २३० किलोमीटर अंतर सायकलवरून पार करणारी आणि ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मिळवणारी कु. शौर्या शिंदे हिचा सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. |
शिबिराला ४ सहस्र जणांची ऑनलाईन उपस्थिती !
शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिराचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याचा ४ सहस्रांहून अधिक जणांनी लाभ घेतला.



‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट