|

नवी देहली – लंडन किंवा न्यूयॉर्क सारख्या शहरांत मुसलमान महापौर होऊ शकतात; पण भारतात एखाद्या मुसलमानाला विद्यापिठाचा कुलगुरु होण्याचीही संधी नसते. जर एखादा मुसलमान अशा पदावर पोचला, तर त्याचे भविष्य आझम खान यांच्यासारखे होईल, ज्यांना कारागृहात जावे लागले. (समाजवादी पक्षाचे आझम खान यांना विविध गुन्ह्यांच्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावली होती.) अल्-फलाहच्या जावेद अहमद यालाही कारागृहात टाकण्यात आले. स्वातंत्र्यापासून देशातील सरकार मुसलमानांना डोक वर काढू न देण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच देशाला विनाकारण धार्मिक आधारावर विभागले जात आहे, असे विधान ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या इस्लामी संस्थेचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी एका कार्यक्रमात केले. या विधानावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
🔥 Victimhood Politics EXPOSED 🚨
Maulana Arshad Madani claims “Muslims can become Mayors abroad but not even Vice-Chancellors in India!” 🤦♂️
And he even defends the President of Al-Falah University – accused of Jihadi terror plotting against the nation😡
These so-called… https://t.co/Sc7pRGleYj pic.twitter.com/Z6ncpYv35o
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 23, 2025
(म्हणे) ‘मुसलमानच नव्हे, तर दलित आणि इतर मागासवर्गीय यांच्यावरही अन्याय ! – काँग्रेस नेते उदित राज यांचे मदनी यांना समर्थन

काँग्रेस नेते उदित राज म्हणाले की, केवळ मुसलमानच नव्हे, तर दलित आणि इतर मागासवर्गीय यांचीही विविध पदांवर नेमणूक केली जात नाही. (भारताच्या राष्ट्रपती आदिवासी समाजातील असतांना अशा प्रकारचे विधान म्हणजे खोटारडेपणाचे टोक आहे ! – संपादक) केंद्र सरकार केवळ एका विशिष्ट समाजाला पुढे नेते. देशातील ४८ केंद्रीय विद्यापिठांत एकाही मुसलमान, दलित किंवा मागासवर्गीय कुलगुरु नाही. (एकीकडे देशातून जात-पात संपवण्याच्या बोंबा मारायच्या आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या मागण्या करायच्या, हा समाजद्रोह आहे ! – संपादक) अनेक प्रमुख संस्थांतही ते दिसत नाहीत. संघ आणि भाजप यांच्या विचारसरणीशी संलग्न लोकांनाच जागा दिली जाते. अल्-फलाह विद्यापिठात आतंकवाद्यांच्या कारवाया झाल्या असतील, तर दोषींवर कारवाई हवी. संपूर्ण विद्यापिठाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. अलीकडील भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय यांतील एकही उमेदवार नव्हता. सरकार या समाजांना दूर ठेवत आहे.
|
मुसलमानांना भारतात मिळणारे स्वातंत्र्य अन्य देशांत नाही ! – संत रामविलास वेदांती

अयोध्येतील संत रामविलास वेदांती म्हणाले की, बहुतांश राज्यांत मुसलमान आमदार आहेत, मुसलमान खासदार आहेत. जर त्यांना दडपले गेले असते, तर ते निवडून आले नसते. भारतात जशी स्वातंत्र्याची भावना लोकप्रतिनिधींना दिली आहे, तशी कुठल्याही इतर धर्मियांना मिळत नाही. मुसलमानांना देशात मदरसे उघडण्याची मोकळीक आहे आणि त्यावर कोणतीही मर्यादा नाही. मदनी चुकीचे बोलत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सामाजिक सलोख्यासाठी जे केले, ते यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी केलेले नाही.
चीनमध्ये मुसलमानांची परिस्थिती पहायला हवी. तिथे मशिदी हटवल्या गेल्या आहेत. जगात कुठेही शुक्रवारच्या दिवशी रस्त्यावर नमाजपठण केले जात नाही. भारतात मात्र मुसलमानांना रस्त्यावर नमाजपठण करण्याची मोकळीक आहे. जगात कोणत्याही ठिकाणी मुसलमानांना भारतासारखे स्वातंत्र्य नाही.
भारतातील मुसलमान सुखाने जगतात !
अयोध्येचे सीताराम दास महाराज म्हणाले की, मदनी यांचे वक्तव्य निंदनीय आहे. भारतातील मुसलमान शांततेत रहातात. अनेक देशांत मशिदी पाडल्या जातात. चीन आणि अमेरिका येथे अशीच स्थिती आहे. त्यावर ते काही बोलत नाहीत. भारतात अनेक मुसलमान मंत्री झाले आहेत आणि आरिफ खान बिहारचे राज्यपाल आहेत. हे त्यांना दिसत नाही.
हिंदूंपेक्षा मोठा मित्र मुसलमानांसाठी कुणी नाही ! – भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन

भाजपचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, अरशद मदनी यांचे वक्तव्य अत्यंत दायित्वशून्यतेचे आणि चुकीचे आहे. भारतातील अल्पसंख्यांकांना जितके अधिकार मिळतात तितके इतर देशांत मिळत नाहीत. भारतातील मुसलमानांसाठी भारताहून चांगले ठिकाण नाही, हिंदूंपेक्षा चांगला मित्र नाही आणि पंतप्रधान मोदींपेक्षा योग्य नेतृत्व नाही. देश ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या ध्येयावर चालतो. अनेक शहरांत मुसलमान महापौर झाले आहेत. मोठ्या घटनात्मक पदावरही ते दिसतात. भारताचा मुसलमान राष्ट्रपती होऊ शकतो, मुख्य न्यायाधीश होऊ शकतो, क्रिकेट किंवा हॉकी संघाचा कर्णधार होऊ शकतो, वायूदलाचा प्रमुख होऊ शकतो. भारतात मुसलमानाला राष्ट्रपतीपद मिळाले आहे. तरीही मदनी असे वक्तव्य करतात.
मदनी यांनी क्षमा मागावी !
शाहनवाज हुसेन यांनी आरोप केला की, एकेकाळी या संस्थेने (‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने) स्वातंत्र्यलढ्यात भूमिका बजावली; पण आता ती घराणेशाहीच्या प्रभावाखाली आली आहे. सर्वांसाठी दारे उघडी नाहीत. भारतात मुसलमानांना दडपले जाते, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. मदनी यांनी क्षमा मागावी.
भारताची लोकशाही भक्कम ! – जनता दल (संयुक्त)
जनता दल (संयुक्त) पक्षाचे नेते नीरज कुमार म्हणाले की, भारताची लोकशाही सुरक्षित आणि सशक्त आहे. राज्यघटना सर्वांना समान अधिकार देते. प्रत्येक धर्मीय आणि जाती यांच्या लोकांना उन्नतीची संधी आहे. मग भारतावर प्रश्न का ?
संपादकीय भूमिका
|
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !