सिमला (हिमाचल प्रदेश) येथील अनधिकृत संजौली मशिदीचे प्रकरण

सिमला (हिमाचल प्रदेश) – येथील संजौली परिसरातील अनधिकृत मशिदीला टाळे ठोकण्याच्या मागणीसाठी ‘देवभूमी संघर्ष समिती’ने २१ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयाने या मशिदीचे बांधकाम अवैध ठरवत त्यावर कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता; मात्र अद्यापही कारवाई झालेली नसल्याचे समितीकडून आंदोलन केले जाणार आहे. समितीचे सदस्य १८ नोव्हेंबरपासून संजौली पोलीस चौकीजवळ उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या तक्रारी मागे घेण्याची त्यांची मागणी आहे. गेल्या आठवड्यात नमाजपठण रोखण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही तक्रार नोंदवण्यात आली होती. मशिदीचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याचीही मागणी समितीकडून करण्यात आली आहे.
🚨 Devbhoomi Sangharsh Samiti hits the streets
👉 Demand: Demolition of the unauthorised Sanjauli Mosque in Shimla, HP.
Even after clear court orders, the structure still stands. Under Congress rule, Hindus are forced to protest just to ensure the law… https://t.co/FHB3CxWLvs pic.twitter.com/uM1obm8wcW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 21, 2025
१. समितीचे सह-संयोजक विजय शर्मा यांनी सांगितले की, १९ नोव्हेंबरला संध्याकाळी पुढील रणनीतीसाठी बैठक घेण्यात आली आणि मागण्यांवर ठाम रहाण्यासाठी २१ नोव्हेंबरला मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२. विजय शर्मा यांनी पालकांना आवाहन केले आहे की, आंदोलनाच्या दिवशी मुलांना शाळेत पाठवू नये, जेणेकरून त्यांना अडचण येऊ नये. २१ नोव्हेंबरला संजौलीत मार्ग बंद केला जाईल. आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत.
३. समितीचा दावा आहे की, न्यायालयाने मशिदीला अनधिकृत ठरवल्याने या ठिकाणी कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत.
४. समितीचा आरोप आहे की, न्यायालयाने अवैध बांधकाम पाडण्यास सांगितले असतांनाही कारवाई होत नाही, याउलट समितीच्या सदस्यांविरुद्ध गुन्हे नोंदवले जात आहेत. शर्मा यांनी सांगितले की, २१ नोव्हेंबरला होणारे आंदोलन गेल्या वर्षी ११ सप्टेंबरला झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठे असेल. मागच्या आंदोलनाच्या वेळी झालेल्या झटापटीत १० जण घायाळ झाले होते.
संपादकीय भूमिका
|
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले