मतचोरीच्या आरोपांवरून माजी निवृत्त न्यायाधीश, सैन्य आणि सरकारी अधिकारी यांची काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी देहली : काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांची प्रतिमा सतत डागाळण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे लोकशाही रचनेत अनावश्यक अविश्वास निर्माण होत आहे. निवडणूक आयोग देशाच्या निवडणूक व्यवस्थेचा सर्वांत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने जनतेचा विश्वास अल्प होतो, अशा शब्दांत देशभरातील २७२ निवृत्त न्यायाधीश आणि निवृत्त सरकारी अधिकारी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांवर कडक टीका करणारे एक उघड पत्र प्रसारित केले आहे. यामध्ये १६ माजी न्यायाधीश, १२३ निवृत्त सरकारी अधिकारी (१४ माजी राजदूतांसह) आणि १३३ निवृत्त सैन्य अधिकारी यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करणार्या ३ पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. या परिषदांमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला मोदी सरकारची ‘बी-टीम’ (सहकारी पक्ष) म्हटले.
⚠️ 272 Eminent Voices Call Out Congress: After Targeting the Armed Forces, Judiciary & Parliament – Now the ECI
🇮🇳📜 A group of 272 distinguished Indians – including 16 Judges, 123 retired bureaucrats (14 Ambassadors), and 133 retired Armed Forces officers have issued a… pic.twitter.com/HaV7WWuaOC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 19, 2025
या पत्रात पुढे म्हटले आहे की,
राजकीय मतभेद लोकशाहीचा भाग आहेत; परंतु घटनात्मक संस्थांवर वारंवार आरोप करणे हे राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध आहे.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’