Asad Khan Jeelany : भारतमातेला ‘डायन’ (चेटकीण) म्हणणारा काँग्रेसचा नेता असद जिलानी याला अटक

अटकेनंतर जिलानी याने कान धरून ‘भारतमाता की जय’च्या दिल्या घोषणा

विदिशा (मध्यप्रदेश) : विदिशा जिल्ह्यातील सिरोंज भागातील काँग्रेसचा नेता असद खान जिलानी याला भारतमातेविषयी अवमानकारक विधान केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्मृती नाण्याच्या संदर्भात जिलानीने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये भारतमातेला ‘डायन’ म्हटले होते.

त्याने पुढे लिहिले होते की,

‘या (भारतमातेची) डायनची पिशाच पूजा करावी. जिच्या हातात तिरंगा नाही, ती आमची भारतमाता नाही.’ जिलानी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्यानंतर जिलानी याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी अटक केल्यानंतर कान पकडून ‘भारतमाता की जय’ घोषणा देताना असद खान जिलानी

त्यापूर्वी स्थानिक लोकांनी जिलानी याचा पुतळाही जाळला. जिलानीच्या अटकेनंतर एक व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात जिलानी कान धरून ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देत असल्याचे आणि त्या वेळी पोलीसही उपस्थित असल्याचे दिसत आहे.

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

संपादकीय भूमिका

अशांनाही आता फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तरच अशा धर्मांधांना आणि देशद्रोह्यांना धाक बसेल !