हैफा शहराचे महापौर योना याहॅव यांचे विधान

हैफा (इस्रायल) – तुर्क मुसलमानांच्या ऑटोमन साम्राज्यापासून आम्हाला ब्रिटिशांनी नव्हे, तर भारतीय सैनिकांनी मुक्त केले. शालेय इतिहासाच्या पुस्तकात तसे पालट केले जात आहेत, असे विधान हैफा शहराचे महापौर योना याहॅव यांनी केले. महापौर याहॅव यांनी भारतीय सैनिकांच्या शौर्याची आठवण म्हणून स्मृतीस्थळाला भेट देऊन वरील विधान केले. हैफा येथील इयत्ता तिसरी ते पाचवी पर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकात या धड्याचा समावेश आहे.
🇮🇳✨ Mayor of Haifa: “It wasn’t the British, it was Indian soldiers who liberated us from the Ottomans.”
📚 In every school here, we are correcting the history books to reflect this truth.
A proud chapter of Indian valour remembered on foreign soil! 🌍🚩pic.twitter.com/lPwMvMaJrM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 30, 2025
याहॅव पुढे म्हणाले की,
आम्हाला सातत्याने सांगितले गेले की, हे शहर ब्रिटिशांनी मुक्त केले. एकदा ‘हिस्टॉरिकल सोसायटी’मधील संशोधकांनी सांगितले की, त्यांनी यासंदर्भात पूर्ण संशोधन केले आहे. त्यांना आढळून आले की, या शहराला ब्रिटिशांनी नव्हे, तर भारतियांनी मुक्त केले. प्रत्येक शाळेत आता पुस्तकांमध्ये तसा पालट करण्यात येत आहे. आता येथील तरुणांना हा इतिहास ठाऊक झाला आहे.
काय आहे इतिहास ?

पहिल्या महायुद्धातील हैफा येथील लढाई जगप्रसिद्ध आहे. भारताच्या घोडदळाच्या तुकडीने केवळ भाला आणि तलवार यांच्या जोरावर ऑटोमनच्या सैन्याला अत्यंत कठीण अशा माउंट कार्मल येथून पिटाळून लावले होते. भारतीय सैनिकांना अतिशय प्रतिकूलतेचा सामना करावा लागला होता. ही लढाई इतिहासातील शेवटची उत्कृष्ट अशी घोडदळाची लढाई मानली जाते. भारतातही २३ सप्टेंबर हा दिवस प्रतिवर्षी ‘हैफा डे’ म्हणून साजरा केला जातो. घोडदळाची ही मोहीम वर्ष १९१८ मध्ये तत्कालीन १५व्या ‘इंपिरिअल कॅव्हलरी ब्रिगेड’ने यशस्वी केली होती.
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !