Karnataka Love Jihad : ख्वाजा शिरहट्टी याने खोट्या रहिवासी कागदपत्रांच्या आधारे केले हिंदु तरुणीशी लग्न !

विहिंप आणि बजरंग दल यांच्याकडून पोलिसांत तक्रार

‘युट्यूबर’ ख्वाजा शिरहट्टी

धारवाड (कर्नाटक) – ‘युट्यूबर’ (यू ट्यूबर म्हणजे स्वतःच्या ‘यू ट्यूब’ वाहिनीद्वारे व्हिडिओ प्रसारित करणारी व्यक्ती) ख्वाजा शिरहट्टी उपाख्य मुकळेप्पा याने खोट्या रहिवासी कागदपत्रांच्या आधारे एका हिंदु तरुणीला फूस लावून तिच्याशी लग्न केले आहे, असा आरोप करत विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्वाजाविरुद्ध धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

या तक्रारीनुसार ख्वाजा हा हेबळी फार्म येथील रहिवासी आहे. त्याने स्वतः मुंडगोडच्या गांधीनगरचा रहिवासी असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे बनवली आणि ५ जून या दिवशी उपनिबंधक कार्यालयात एका हिंदु तरुणीशी लग्न केले. पोलिसांनी ख्वाजा  आणि त्या तरुणीला बोलावून चौकशी केली असता त्या दोघांनीही परस्पर संमतीने लग्न केल्याचे सांगितले, असे समजते.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांध मुसलमानांचे फावले आहे, हेच अनेक घटनांवरून दिसून येते. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?