Kerala College Curtain :  केरळमधील एका महाविद्यालयातील चर्चासत्रात विद्यार्थी आणि मुसलमान विद्यार्थिनी यांच्यामध्ये लावण्यात आला पडदा !

केरळमध्ये शरीयत लागू झाल्यासारखी स्थिती

कासरगोड (केरळ) – येथील एका महाविद्यालयामध्ये गाझावरील विषयाच्या संदर्भातील चर्चासत्राच्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये पडदा लावण्यात आला होता. हिजाब घातलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना पडद्यामागे बसवण्यात आले. याचे छायाचित्र प्रसारित झाले असून त्यात स्पष्ट दिसत आहे की, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यामध्ये पडदा लावलेला आहे आणि इस्लामी कट्टर विचारसरणीचा डॉ. अब्दुल्ला बेसिल सीपी मंचावर बोलत आहे.

‘गाझापासून विज्ञान ते धर्मापर्यंत’, असा या चर्चासत्राचा विषय होता. डॉ. अब्दुल्ला बेसिल नेहमीच हिजाबचे समर्थन करून त्याचा प्रचार करतो. यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यात एका विद्यार्थिनीने हिजाबविरोधात बोलताच बेसिलने विचित्र तर्क मांडून तिला गप्प केले होते.

संपादकीय भूमिका

केरळमध्ये शरीयत लागू झाल्यासारखीच ही स्थिती आहे. अशी स्थिती सध्या तालिबानच्या कह्यातील अफगाणिस्तानमध्ये दिसून येते. केरळमध्ये साम्यवादी आघाडी सरकारचे राज्य त्याच पद्धतीने कारभार करत आहे, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !