अतृप्त पितरांचा त्रास दूर करण्यासाठी करायचे आध्यात्मिक स्तरावरील विविध उपाय !

१९ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्या ‘अतृप्त पितरांचा त्रास दूर करण्यासाठी करायचे आध्यात्मिक स्तरावरील विविध उपाय !’ या लेखामध्ये आपण कलियुगात बहुतांश मनुष्यांना अतृप्त पितरांचा त्रास होण्यामागील कारण, पितरांचे त्रिगुणांनुसार असणारे प्रकार, दत्तगुरूंचे पितरांना सद्गती देण्याचे कार्य आणि पितरांसाठी श्राद्ध करणे, हा भाग पाहिला, आज उर्वरित भाग पाहूया.

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/958114.html

६. व्यक्तीला अतृप्त पितरांचा त्रास असल्यास तिने दत्तोपासना कशी करावी ? 

उत्तर : ‘व्यक्तीला होणारा अतृप्त पितरांचा त्रास न्यून करण्यासाठी ती पुढील सारणीत दिल्याप्रमाणे उपासना करू शकते. त्यामुळे तिला व्यष्टी स्तरावर विविध प्रकारचे लाभ होतात.

टीप १ – अन्य उपायांच्या अंतर्गत पुढे सांगितल्याप्रमाणेही उपाय करू शकतो.

अ. दत्तक्षेत्रातील, दत्तमंदिरातील मूर्तीसमोर किंवा देवघरात दत्ताचे चित्र ठेवून त्याच्यासमोर सात्त्विक उदबत्ती लावणे, तिची विभूती कपाळाला लावणे आणि थोडीशी विभूती पाण्यात घालून ते दत्ततीर्थ म्हणून प्राशन करणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

आ. ‘मला किंवा आम्हाला होणारा (स्वतःचे आणि कुटुंबियांचे नाव लिहून) अतृप्त पितरांचा त्रास दूर होऊ दे’, अशी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना आहे’, ही दत्तगुरूंना करायची प्रार्थना कागदावर लिहून त्या प्रार्थनेच्या भोवती ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’, या नामजपाचे मंडल घालणे आणि तो कागद एखाद्या धार्मिक ग्रंथात किंवा देवघरात ठेवणे

इ. झोपण्यापूर्वी अंथरुणाच्या कडेला दत्तगुरूंच्या नामपट्ट्यांचे मंडल घालणे

ई. खडे-मिठाच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसणे (हा उपाय प्रतिदिन १ – २ वेळा करावा.)

उ. दत्तगुरूंची मानस आरती, मानसपूजा किंवा भावार्चना करणे

ऊ. दत्तात्रेयांचे ध्यान करून दत्तगुरूंच्या अनुसंधानात रहाणे

ए. दत्तयंत्राची भावपूर्ण पूजा करणे

ऐ. दत्तक्षेत्री जाऊन तेथे दत्तगुरूंच्या मूर्तीचे किंवा दत्तावतारांचे भावपूर्ण दर्शन घेऊन तेथे दिला जाणारा महाप्रसाद ग्रहण करणे

ओ. काही दिवस दत्तक्षेत्री राहून दत्तगुरूंची नामजपादी उपासना करणे

औ. नारायण बळी, नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध इत्यादी विधी करणे

टीप २ – व्यक्तीला होणार्‍या लाभाचे प्रमाण हे व्यक्तीची तळमळ, श्रद्धा, भाव, प्रारब्ध आणि तिच्यावरील श्री गुरूंची कृपा यांनुसार भिन्न भिन्न असते.

७. कुटुंबाला किंवा वास्तूला अतृप्त पितरांचा त्रास असल्यास दत्तोपासना कशी करावी ? 

उत्तर : जर एखाद्या कुटुंबाला अतृप्त पितरांचा त्रास असेल, तर त्यांनी व्यष्टी स्तरावर वरील आध्यात्मिक स्तरावरील उपायांना पुढील समष्टी उपायांची जोड द्यावी.

टीप १- दत्तयागाची प्रधान देवता दत्तात्रेय असल्याने त्यांच्या चरणी यथाशक्ती धन, धान्य, फुले, फळे इत्यादींच्या स्वरूपात अर्पण देणे

टीप २ – जवळच्या दिवंगत नातलगांचे नियमितपणे वर्षश्राद्ध, तसेच अन्य दिवंगत नातेवाइकांसाठी पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे नारायणबळी, नागबळी, कालसर्पशांती, त्रिपिंडी श्राद्ध, पालाश विधी इत्यादी विधी करणे

टीप ३ – सात्त्विक उदबत्ती किंवा धूप लावून आणि वास्तूमध्ये गोमूत्र शिंपडून वास्तूची शुद्धी करणे

टीप ४ – ‘पितरांचा अपमान करणे किंवा त्यांच्यासाठी श्राद्ध न करणे’, यांमुळे व्यक्तीला पितृदोष लागतो.

टीप ५ – व्यक्तीला होणार्‍या लाभांचे प्रमाण हे व्यक्तीची तळमळ, श्रद्धा, भाव, प्रारब्ध आणि तिच्यावरील श्री गुरूंची कृपा यांनुसार भिन्न भिन्न असते.

८. वरीलप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील दत्तगुरूंची उपासना अन् आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यामुळे उपासक, वास्तू आणि स्थान यांना होणारे लाभ 

अ. दत्तगुरूंवरील श्रद्धा वाढल्याने त्यांची कृपा संपादन करता येते. त्यामुळे व्यक्ती, कुटुंब आणि वास्तू येथे असणार्‍या अतृप्त पितरांचा वास दूर होतो.

आ. व्यक्ती, कुटुंब आणि वास्तू यांच्या भोवती संरक्षककवच निर्माण झाल्याने त्यांचे अतृप्त पितरांच्या लिंगदेहांपासून रक्षण होते.

इ. दत्तगुरूंप्रतीचा भाव जागृत झाल्याने त्यांची कृपा ग्रहण करता येते. त्यामुळे साधनेतील व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील १० ते ५० टक्के अडथळे दूर होतात.

ई. व्यक्तीचा देह, मन, कुटुंबीय आणि वास्तू येथे वावरणार्‍या त्रासदायक पितृलहरी नष्ट होऊन तेथे चैतन्य कार्यरत होते. त्यामुळे व्यक्तीला मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य लाभते.

उ. दत्तगुरूंच्या कृपेने काही अतृप्त पितरांनी साधनेला आरंभ केल्याने ज्यांची पितृयोनीतून मुक्त होण्याची वेळ जवळ आलेली असते, त्यांना सद्गती मिळते. त्यामुळे त्यांच्या वंशजांना होणारा अतृप्त पितरांचा त्रास न्यून होतो किंवा काही जणांचा त्रास पूर्णपणे जातो.

९. सारांश 

अशा प्रकारे अतृप्त पितरांना गती देण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर उपाय केल्याने व्यक्तीला लागलेला पितृदोष दूर होऊन ती पितृऋणातून मुक्त होते. पितृपक्ष संपल्यावरही जर अतृप्त पितरांचा त्रास होत असेल, तर संपूर्ण वर्षभरात वर सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंची उपासना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय भावपूर्णरित्या अन् नियमितपणे केले, तर व्यक्ती, कुटुंब आणि वास्तू यांना होणारा अतृप्त पितरांचा त्रास न्यून होऊन त्यांचे कृपाशीर्वाद लाभतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्ष होतो.

‘श्री गुरुदेवांच्या कृपेनेच मला अतृप्त पितरांचा त्रास न्यून करण्यासाठी दत्तोपासना आणि वरील आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ज्ञानसूत्रे उमजली’, याबद्दल मी दत्तस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

(समाप्त)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२५)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक