सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘मला गुरुकृपेने सोलापूर सेवाकेंद्रात राहून साधना करण्याची संधी मिळाली. तेथे रहायला गेल्यानंतर गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला शिकता आले. तेथे गेल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीमती मीना नकाते

१. ‘सोलापूर सेवाकेंद्रात पाऊल ठेवता क्षणी ‘मी गोकुळात आले आहे’, असे मला वाटले.

२. सेवाकेंद्रातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील चरणांवर नतमस्तक होणे आणि डोळ्यांतून भावाश्रू येणे

मी सेवाकेंद्रातील सुखासनावर बसल्यावर मला समोरच गुरुमाऊलींचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) छायाचित्र दिसले. तेव्हा ‘गुरुमाऊली माझ्याकडे कुतूहलाने पहात आहेत’, असे मला जाणवले. आई आणि मुलगी जशा एकमेकींना भेटतात, तसे मी त्यांच्या छायाचित्राकडे पळत गेले. एरव्ही मला गुडघेदुखीमुळे चालतांना त्रास होतो; परंतु त्या वेळी मला समजलेच नाही की, ‘मी कधी त्यांच्या छायाचित्रातील चरणांवर नतमस्तक झाले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले.’

३.  पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या संत, वय ३७ वर्षे) मला सांगत होत्या, ‘‘काकू, तुम्ही सेवाकेंद्रात या.’’ ‘मी सेवाकेंद्रात आले आहे’, हे पू. दीपाली मतकर यांना सांगितले. तेव्हा पू. ताईंना पुष्कळ आनंद झाला.

४. अन्नपूर्णाकक्षातील साधिकांमधील प्रेमभाव

अन्नपूर्णाकक्षातील साधिका सुश्री कमल केंभावी आणि श्रीमती जामदार यांच्याकडून मला प्रेमभाव शिकायला मिळाला. त्या दोघी स्वयंपाक करत होत्या. त्यांनी माझी विचारपूस केली आणि मला सरबत दिले. त्या दोघी माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, तरी त्या ‘आमची पुष्कळ दिवसांपासून ओळख आहे’, अशाप्रकारे माझ्याशी वागत होत्या. ‘मी त्यांच्या समवेत पुष्कळ दिवसांपासून रहात आहे’, असे मला वाटले. ‘मला गोकुळात आल्यासारखे का जाणवले ?’, हे माझ्या लक्षात आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या प्रीतीमुळे अन् पू. दीपालीताई यांच्यामधील वात्सल्यभावामुळे मला सोलापूर सेवाकेंद्रातील ३ दिवसांच्या वास्तव्यात पुष्कळ काही भरभरून मिळाले.’

– श्रीमती मीना नकाते (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६२ वर्षे), जुळे सोलापूर, सोलापूर (७.५.२०२६)


सेवाकेंद्रातील साधकांवर प्रीती करणार्‍या पू. दीपाली मतकर !

पू. दीपालीताई यांच्यामधील वात्सल्यभावामुळे सेवाकेंद्रातील सर्व साधक आनंदी आणि हसतमुख आहेत. पू. ताई सर्वांची विचारपूस करून काळजी घेतात. सर्व साधक मनाने एक झाले आहेत. मला आश्रमातील साधकांच्या चेहर्‍यावर कसलाही ताण जाणवत नव्हता. सर्व साधक मला आनंदी दिसत होते.

पू. दीपाली मतकर

पू. दीपाली मतकर यांच्या खोलीत गेल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. मी पू. दीपालीताईंच्या खोलीत गेल्यावर ‘मी एका मोठ्या पोकळीत जात आहे’, असे मला वाटले. ‘खोलीभर गोल फिकट निळी वलये फिरत आहेत’, असे मला जाणवले.

आ. मला मार्च २०२६ पासून माझ्या कमरेखालील भाग बांधल्यासारखा वाटत होता; मात्र ‘जशी मी पू. दीपालीताईंच्या खोलीत जात होते, तसे माझ्या शरिरातून काहीतरी बाहेर जात आहे’, असे वाटत होते. मला कमरेपासून खाली हलकेपणा जाणवू लागला.

इ. पू. दीपालीताईंची खोली दैवी झाली आहे. मी घरी असतांना मला कित्येक दिवस रात्री झोप येत नाही; मात्र पू. ताईंच्या खोलीत झोपल्यावर पहिल्याच दिवशी मला शांत झोप लागली.

ई. खोलीमध्ये मोरपंखी, पिवळे आणि आकाशी या रंगांचे दैवी कण दिसत होते. दैवी कणांकडे पाहिल्यावर मी अंतर्मुख होऊन मला निर्विचार अवस्था अनुभवता आली.

उ. पू. दीपालीताईंच्या खोलीत माझा नामजप आपोआप होत होता. तो मला ऐकू येत होता.

ऊ. मला गुडघेदुखी असल्यामुळे मी दिवसातून २ – ३ वेळा गुडघे शेकत होते. मी सेवाकेंद्रात रहायला गेल्यानंतर माझ्या गुरुमाऊलीने पू. दीपालीताईंची खोली निवासासाठी दिली. त्या खोलीतील चैतन्यामुळे मला चैतन्य मिळत होते. त्याचा मला झालेला लाभ मी शब्दांत सांगू शकत नाही.

ए. पू. दीपालीताईंचा पलंग मला झोपाळ्यासारखा वाटत होता.

 ऐ. मी पू. ताईंच्या खोलीत रात्री झोपायला गेल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना शरण जाऊन प्रतिदिन आत्मनिवेदन करत होते. तेव्हा मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्रीकृष्णाच्या चित्रात दिसत होत्या. मी त्यांना सूक्ष्मातून पुष्कळ काही सांगत होते.

ओ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ माझ्याकडे बघून स्मितहास्य करत होत्या. मी आणि त्या लक्ष्मीलोकांत गेलो. त्या मला प्रीतीने झोपाळ्यावरची दोरी घेऊन हालवत होत्या. मी आत्मनिवेदन करत असतांना मला केव्हा झोप लागली ते समजले नाही.

औ. मला खोलीत पुष्कळ गारवा जाणवत होता. माझ्या संपूर्ण शरिरावर रोमांच येत होते.

– श्रीमती मीना नकाते (७.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक