वैचारिक प्रगल्भता आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या दैवी बालिका कु. आराधना धाटकर अन् कु. शर्वरी कानस्कर !

१. बालसाधिकेला ‘श्रीकृष्णाच्या मूर्तीतून चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे आणि मूर्तीकडे पहातांना तिचा आपोआप नामजप चालू होणे

कु. आराधना धाटकर

कु. आराधना धाटकर (आध्यात्मिक पातळी ५६ टक्के, वय १३ वर्षे) : ‘मला तुम्हाला एक अनुभूती सांगायची होती. काल मी नामजप करत असतांना तुम्ही मला दिलेली श्रीकृष्णाची मूर्ती हातात घेऊन बसले होते. त्या वेळी ‘त्या मूर्तीतून चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा माझ्या हाताला थंडावा जाणवला. मी मूर्तीकडे पहात असतांना माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप आपोआप चालू झाला. मी नामजप करत होते आणि ‘दीड घंटा कधी होऊन गेला’, हे मला कळलेही नाही. मग आईने मला आठवण करून दिली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान ! इतक्या लहान वयात नामजप होत आहे !’

२. युवासाधिकेला व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सहसाधकांनी स्वभावदोषांची जाणीव करून देणे आणि तिने श्री भवानीमातेला प्रार्थना केल्यावर देवीने भावस्थितीत रहाण्यास सांगून सर्व साधकांमध्ये देवाला पहाण्यास सांगणे 

कु. शर्वरी कानस्कर

कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे) : ‘नमस्कार गुरुदेवा ! माझ्यात ‘मनमोकळेपणाचा अभाव’, हा स्वभावदोष आहे. जेव्हा मी आश्रमात आले होते, तेव्हा त्या स्वभावदोषाची तीव्रता अधिक होती आणि माझ्या मनात अधून-मधून भीतीही असायची. मला व्यष्टी साधनेच्या आढाव्यात या स्वभावदोषाची जाणीव करून दिली. ‘या स्वभावदोषावर मात करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, या संदर्भात साधक मला साहाय्य करायचे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुला स्वभावदोषांची जाणीव कुणी करून दिली ?

कु. शर्वरी कानस्कर : व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधक आणि सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे) यांनी मला स्वभावदोषांची जाणीव करून दिली. त्यानंतर मी श्री भवानीदेवीच्या मंदिरात गेले आणि तिला प्रार्थना केली, ‘आई, माझ्यात ‘मनमोकळेपणाचा अभाव’, हा स्वभावदोष आहे, तर मी काय प्रयत्न करू ? तूच सांग.’ तेव्हा आई, म्हणजे श्री भवानीमाता म्हणाली, ‘तू काळजी करू नकोस. तू जशी आहेस, तशी स्थिर आणि भावस्थितीत रहा. सर्व साधकांमध्ये देवाला पहा. मग तुला त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येईल.’ त्यानंतर माझ्याकडून आपोआप तसे प्रयत्न व्हायला लागले.

२ अ. श्री भवानीदेवीने सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !

१. मी माझ्यापेक्षा उंच असलेल्या एखाद्या ताईला आलिंगन दिल्यास ‘तिच्या हृदयात तुमच्या चरणपादुका आहेत आणि मी त्यांना आलिंगन देत आहे’, असे मला जाणवते.

२. कधीतरी वयस्कर आजी किंवा आजोबा माझ्या डोक्यावरून हात फिरवतात. तेव्हा ‘तुम्हीच माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहात’, असे मला जाणवते.

३. बालसाधक आल्यावर ते मला ‘‘ताई, ताई !’’, अशी हाक मारतात. तेव्हा ‘ती बाळकृष्णाची लहान रूपे आहेत’, असे मला जाणवते.

४. साधकांचे हास्य पाहून ‘त्यांचे हास्य, म्हणजे तुमचेच हास्य आहे’, असे मला जाणवते.

२ आ. साधना केल्यानेच खरा आनंद अनुभवता येतो ! : ‘आनंद हा कुठल्या गोष्टीवर अवलंबून नसतो, तर तो आतमध्ये असतो आणि तो आनंद अनुभवायचा असतो’, हे माझ्या लक्षात आले. आपण मायेत असतांना जो आनंद वाटतो, तो आनंद नाही, तर ते सुख असते; मात्र खरा आनंद साधना केल्यानेच मिळतो. ‘आपल्या कृपेमुळे मला आता त्याचा एक अंशमात्र हळूहळू अनुभवता येत आहे’, याबद्दल गुरुदेवा, आपल्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक